advertisement

Monkeypox Symptoms : मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे काय?, कशी काळजी घ्यावी, महत्त्वाची माहिती

Last Updated:

डॉ. विनंती पोळ यांनी याबाबत माहिती दिली. मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. मंकीपॉक्स हा डीएनए व्हायरस आहे. या व्हायरसचा संसर्ग हवेतून होत नाही. मात्र, रुग्ण संपर्कात आल्यास संसर्गाची भीती असते.

+
मंकीपॉक्स

मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : मंकीपॉक्स एक झुनोसिस आजार आहे. याचा अर्थ असा की, हा एक असा आजार आहे, जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. खार, गॅम्बियन शिकार करणारे उंदीर, डॉर्मिस, माकडांच्या विविध प्रजाती आणि इतरांसह प्राण्यांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसच्या संसर्गाचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आता या आजाराबाबत भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत, ते जाणून घेऊयात.
advertisement
डॉ. विनंती पोळ यांनी याबाबत माहिती दिली. मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. मंकीपॉक्स हा डीएनए व्हायरस आहे. या व्हायरसचा संसर्ग हवेतून होत नाही. मात्र, रुग्ण संपर्कात आल्यास संसर्गाची भीती असते.
advertisement
श्वसनावाटे आणि शारिरीक संबंधातून एकाच्या मार्फत दुसऱ्या व्यक्तीला याची लागण होऊ शकते. या विषाणूचा त्वचा, श्वसननलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो. या व्हायरसपासून वाचवण्यासाठी ज्यांना लागण झाली आहे, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे, असे डॉ. सुरेश कुमार यांनी म्हटले. आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही.
advertisement
मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना, अस्वस्थपणा यांचा समावेश होतो. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरावर डाग तसेच राहतात.
मंकीपॉक्स झाल्यास काळजी कशी घ्यावी?
- लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा.
advertisement
- दुय्यम बॅक्टेरिअल संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत.
- पुरेशा प्रमाणात द्रव्ये द्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही.
- पोषक आहार देण्यात यावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monkeypox Symptoms : मंकीपॉक्स या आजाराची लक्षणे काय?, कशी काळजी घ्यावी, महत्त्वाची माहिती
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement