किडनी फेल होण्याआधी शरीरातून मिळतात 'हे' संकेत; वेळीच व्हा सावध

Last Updated:

चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

News18
News18
पुणे, 26 सप्टेंबर : सध्या किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालल्याचे पाहिला मिळत आहे. बदलती जीवनशैली, सकस आहाराची कमतरता, अतिरेकी मद्यपान, चुकीच्या खाणपान सवयी आदींमुळे भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि हळूहळू हा महत्त्वाचा अवयव कमकुवत होऊ लागतो आणि शेवटी किडनीचं काम करणं मंदावतं. किडनी फेल होण्याची लक्षणं नेमकी कोणती? यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल पुण्यातील बी. जे महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
किडनी खराब झाल्यावर कुठली लक्षणं आढळतात?
यामध्ये किडनी खराब झाली की त्याला क्रॉनिक म्हणतात. मळमळणे, उलटी होणे दम लागतो, भूक लागत नाही चक्कर येते, लघवी कमी किंवा जास्त प्रमाणात होते, डोळ्यांच्या सभोवताली सूज असते, काम कराव वाटतं नाही, डोळ्यांच्या आणि पायाच्या भोवती सूज येते.
advertisement
यासाठी कुठली काळजी घ्याल?
ब्लड टेस्ट करू शकतो. सोनोग्राफीमध्ये खडे सापडले तर सिटी स्कॅन करू शकतो. किडनीतले खडे काढून फंक्शन नॉर्मल होत.
खराब होण्याची लक्षणं ?
किडनी ही डायबिटीसमुळे ब्लड प्रेशर, रक्त वाहिन्या चॉकप झाल्यामुळे तसेच किडनीमध्ये खडे असतील यामुळे किडनी खराब होत असते.
advertisement
वेळीच निदान करणे गरजेचे
किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णाच्या लघवीच्या रंगात बदल होतो. किडनी निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक लक्षणं शरीराला जाणवत असतात. ते वेळीच ओळखून त्यावर निदान करणे गरजेचे असते. अनेक घटनांमध्ये किडनी बरीच खराब झाल्यावर रुग्णाला त्याबद्दलची माहिती मिळत असते. परिणामी हातातील वेळ निघून गेलेली असते आणि नंतर डायलिसिसची वेळ येते. यामुळे वेळीच ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करू शकता, असं बी. जे महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले.
मराठी बातम्या/हेल्थ/
किडनी फेल होण्याआधी शरीरातून मिळतात 'हे' संकेत; वेळीच व्हा सावध
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement