Cot Death: ...तर झोपेत होऊ शकतो बाळाचा मृत्यू, ‘कॉट डेथ’ टाळण्यासाठी कशी घ्यावी काळजी?

Last Updated:

Cot Death: लहान मुलांमध्ये काही वेळा कॉट डेथ सारखी परस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या बाळासाठी आपण काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा सल्ला.

+
Cot

Cot Death: एक चूक अन् झोपेत होऊ शकतो बाळाचा मृत्यू, ‘कॉट डेथ’ टाळण्यासाठी कशी घ्यावी काळजी?

अहिल्यानगर: सध्याच्या काळात आरोग्याच्या नवनव्या समस्या निर्माण होत असतात. लहान बाळांच्या कॉट डेथ सारख्या घटना देखील आपल्या ऐकण्यात असतील. कॉट डेथ म्हणजे सडन इनफर्ट डेथ सिंड्रोम यामध्ये बाळाचा अचानक झोपेत मृत्यू होतो. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांमध्ये अशाप्रकारे मृत्यू होऊ शकतो. कॉट डेथ नेमकं कशामुळे होतो? त्यावर काय काळजी घ्यावी? याबाबत अहिल्यानगर येथील डॉ. श्रुती धनेश्वर यांनी माहिती दिलीये.
‘कॉट डेथ’ची अनेक कारणे आहेत. याचं एकच एक असं कारण नाही. एक महिन्यांच्या बाळापासून ते एक वर्षाच्या बाळापर्यंत कॉट डेथ होऊ शको. जेव्हा बाळ दूध पिता पिता झोपतं आणि बाळाचा ढेकर काढला नाही तही देखील मृत्यू होऊ शकतो. बाळ आईचं दूध पिऊन तसंच झोपल्यास कधी कधी बाळाला झोपेतच गरळ येतो. तो अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जातो. त्यामुळे बाळाचा श्वास थांबून बाळाचा झोपेतच मृत्यू होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
काही वेळा श्वासोच्छवास अनियमित होतो. बाळ अर्धवट झोपेत असेल तर जागं झाल्यामुळे त्याबाबत कळू शकतं. परंतु, बाळ जास्त गाढ झोपेत असेल आणि मेंदूत क्षणिक बिघाड झाल्यास बाळाला जाग येत नाही. त्यामुळे बाळाचा श्वास थांबतो आणि अचानक मृत्यू होतो. तर काही वेळा झोळीत टाकल्यानंतर झोपेत ताण येऊन किंवा इतर कारणांनी देखील त्याचा मृत्यू होऊ शकतो.
advertisement
काय काळजी घ्यावी ?
बाळाला दूध पाजताना आईने झोपू नये बेडवर पडून दूध पाजत असाल तरी जागे राहून लक्ष दिले पाहिजे. बाळाला दूध पाजल्यावर लगेच झोपवू नये बाळाचा ढेकर काढणे गरजेचे आहे. ढेकर काढूनच बाळाला झोपी लावावे. तसेच बाळाच्या पाण्यात खेळणी ठेवणे बाळाचे अंथरूण स्वच्छ ठेवावे. त्याचप्रमाणे बाळाच्या डोक्याखाली जास्त जाड किंवा मऊ उशीचा वापर करू नये पाण्यात बाळाची स्थिती बदलत जावी. ही काही काळजी घेऊन आपण कॉट डेथ थांबवू शकतो, असे डॉक्टर श्रुती धनेश्वर सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Cot Death: ...तर झोपेत होऊ शकतो बाळाचा मृत्यू, ‘कॉट डेथ’ टाळण्यासाठी कशी घ्यावी काळजी?
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement