Skin Care Tips : तुमची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडतेय? डेली नाईट स्किन केअर रूटीन असं करा, राहील तजेलदार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
वातावरणात गारवा वाढलाय. त्यामुळे आता त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्वचा कोरडी झाली की, अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेला खाज येते. बारीक पुरळ येतात. म्हणून हिवाळ्यात स्किन केअर रूटीन ठरलेले असणे महत्वाचे आहे.
अमरावती : वातावरणात गारवा वाढलाय. त्यामुळे आता त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्वचा कोरडी झाली की, अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेला खाज येते, बारीक पुरळ येतात. म्हणून हिवाळ्यात स्किन केअर रूटीन ठरलेले असणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात डेली नाईट स्किन केअर रूटीन कसं असायला हवं? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
ऑईली स्कीनसाठी डेली नाईट रूटीन
हिवाळ्यात डेली नाईट स्किन केअर रूटीन कसं असायला हवं? याबाबत माहिती देताना डॉ. टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, ऑईली त्वचेला मॉइश्चरायजर लावायची गरज नाही. पण, ऑईली आणि पिंपल्स असलेल्या त्वचेला जर तुम्ही मॉइश्चरायझर लावले नाही तर तुमची त्वचा आणखी जास्त कोरडी होत जाते. कोरड्या त्वचेला मग इन्फेक्शन वाढतात. त्यामुळे ऑईली स्कीनवाल्यांनी ऑईल फ्री असणारे मॉइश्चरायजर रात्री चेहरा धुवून वापरावे. उन्हाळ्यात वापरतो ते फेसवॉश टाळायला पाहिजे. जेंटल क्लिंझर वापरायचं आणि चेहरा धुवायचा, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
पिंपल्स असलेल्या त्वचेचे रूटीन
पुढे त्या सांगतात की, जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर तुम्ही क्लीनडामायसिन आणि नियासिनमाईड असणारे क्रीम रात्रीच्या वेळी लावू शकता. चेहरा धुवून त्यावरच इतर प्रॉडक्ट लावावे. कोरड्या त्वचेसाठी सिरॅमुसाईड असणारे मॉइश्चरायझर येतात ते तुम्ही वापरायला पाहिजे.
advertisement
तुमची त्वचा जर सुरकुत्या असलेली, निस्तेज अतिशय कोरडी असेल त्यासाठी हायल्युरूनिक ऍसिड असलेले मॉइश्चरायजर येतात, ते वापरू शकता. जेंटल क्लिंजरने चेहरा धुवून मॉइश्चरायजर अप्लाय केले तर तेही हिवाळ्यात पुरेसे असतं. इतर काही घरगुती उपाय करून चेहरा आणखी डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे जास्त त्रास असल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 20, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Tips : तुमची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडतेय? डेली नाईट स्किन केअर रूटीन असं करा, राहील तजेलदार

