Benefits of Tulsi Plant बहुगुणी तुळशीचे आहेत ‘इतके’ फायदे, तुमच्या घरात असायलाच हवी आरोग्यदायी तुळस

Last Updated:

Benefits of Tulsi Plant at Home: तुळस ही केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही आरोग्यदायी देखील आहे. जाणून घेऊयात तुळशीचे आश्चर्यकारक फायदे.

प्रतिकात्मक फोटो : आरोग्यदायी तुळशीचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का ?
प्रतिकात्मक फोटो : आरोग्यदायी तुळशीचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का ?
मुंबई: हिंदू धर्मात अनेक झाडांना आध्यात्मिक महत्व आहे. जसं पूजा करताना केळीच्या झाडाचे खांब हवेत, कलशावर आंब्याची पानं हवीत, भगवान शंकराला वाहण्यासाठी बेलाची पानं हवीत, अशी एका ना अनेक उदाहरणे देता येतील. आध्यात्मिक महत्व असलेली दिसायला छोटीसी, मात्र वापरास बहुगुणी अशी वनस्पती म्हणजे तुळस. तुळशीशिवाय कोणती पूजा होऊ शकत नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुळशीला देव मानून तिची पूजा केली जाते. दिवाळीनंतर जोपर्यंत तुळशीचं लग्न होत नाही तोपर्यंत लग्नाचे मुहूर्तही निघत नाहीत. गावातल्या प्रत्येक घराबाहेर तुळशी वृंदावन असतं तर शहरात कुंड्यांमध्ये तुळस दिसून येते. त्यामुळे तुळशीला प्रचंड अध्यात्मिक महत्त्व आहे. मात्र ही तुळस फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायद्याची आहे.
Benefits of Tulsi Plant at Home: बहुगुणी तुळशीचे ‘इतके’ फायदे, तुमच्या घरात असायलाच हवी आरोग्यदायी तुळस

हवा शुद्ध करते

झाडं दिवसा प्राणवायू देतात आणि रात्री कार्बनडाय ऑक्साईड सोडातात असं आपण शाळेत असताना विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं होतं. मात्र तुळशीचं झाडं याला अपवाद आहे. तुळशीचं झाड 24 तास ऑक्सिजन हवेत सोडत असतं. त्यामुळे ज्यांच्या घरात, दारात तुळस असते त्या वातावारणात ऑक्सिजनचं प्रमाण इतर भागापेक्षा जास्त राहून हवा शुद्ध राहते. तुळस ही सल्फर डाय ऑक्साईड, मोनोऑक्साइड यासारखे विषारी वायू शोषून घेते. जिथे तुळस लावलेली असते तिथे एक विशिष्ठ प्रकारचा सुगंध पसरतो. यामुळे मनःस्थिती प्रसन्न राहायला मदत होते. याशिवाय तुळशीच्या रोपांमध्ये डासनाशक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे जिथे तुळशीची लागवड केली जाते तिथे डास कमी दिसून येतात.
advertisement

आरोग्यदायी तुळस

आयुर्वेदात तुळशीच्या फायद्यांचा उल्लेख केला गेलाय. तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तुळशीचा अर्क सर्दी, खोकला, ताप, आणि श्वसनाच्या समस्यांवर प्रभावी असतो. तुळशीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या तक्रारी कमी होतात. तुळशीच्या पानांच्या नियमित सेवनाने कर्करोग, हृदयरोग, श्वसनाच्या समस्या आणि त्वचेच्या आजारांमध्येही फायदा होतो.
advertisement
त्यामुळे इतकी बहुगुणी असलेली तुळस प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Tulsi Plant बहुगुणी तुळशीचे आहेत ‘इतके’ फायदे, तुमच्या घरात असायलाच हवी आरोग्यदायी तुळस
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement