Dark Circles : महागड्या आयक्रीमवर खर्च कशाला? डार्क सर्कल घालवण्यासाठी चिमुटभर हळद ठरेल प्रभावी
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी अनेकजण बाजारातील महागड्या क्रीम्सचा वापर करतात, परंतु यामुळे परिणाम दिसेलच असे नाही. अशावेळी किचनमधील चिमूटभर हळद डार्क सर्कल्सवर प्रभावी ठरते.
झोप पूर्ण न होणे, औषध आणि कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्सच्या रिऍक्शन इत्यादी कारणांमुळे अनेकांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळ तयार होतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्याने चेहरा निस्तेज वाटू लागतो. तेव्हा डोळ्यांखालील ही वर्तुळ घालवण्यासाठी अनेकजण बाजारातील महागड्या क्रीम्सचा वापर करतात, परंतु यामुळे परिणाम दिसेलच असे नाही. अशावेळी किचनमधील चिमूटभर हळद डार्क सर्कल्सवर प्रभावी ठरते.
एलोवेरा आणि हळद :

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी एलोवेरा जेल आणि हळद यांचा वापर प्रभावी ठरतो. या दोघांचे मिश्रण त्वचेसाठी हेल्दी ठरते आणि त्वचा सॉफ्ट आणि डाग रहित बनते. जर तुमच्या डोळ्याखाली देखील डार्क सर्कल्स आले असतील तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की वापरून पाहू शकता.
advertisement
एलोवेरा आणि हळदीचा उपयोग त्वचेवर करण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत एक चमचा हळद आणि एक चमचा एलोवेरा जेल घ्यावे. या दोघांना चांगल्या प्रकारे मिक्स करून डोळ्यांच्या खाली जिथे डार्क सर्कल्स आहेत तिथे लावावे. या उपायामुळे डोळ्यांखालील सूज आणि डार्क सर्कल्स दूर होऊ शकतात.
हळद आणि दही :

advertisement
जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आले असतील तर हळद आणि दही मिक्स करून त्यावर लावल्यास ही समस्या दूर होऊ शकते. सोबतच या मिश्रणाने चेहऱ्यावरील काळे डाग देखील दूर होऊ शकतात.
एका वाटीत एक चमचा हळद पावडर, एक चमचा लिंबाचा रस आणि दही मिक्स करून मिश्रण तयार करा. मगे हे मिश्रण डार्क सर्कल्सने प्रभावित क्षेत्रावर लावा. या घरगुती टिप्समुळे डार्क सर्कल्स हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
advertisement
(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. तेव्हा घरगुती उपायांचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2024 11:03 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dark Circles : महागड्या आयक्रीमवर खर्च कशाला? डार्क सर्कल घालवण्यासाठी चिमुटभर हळद ठरेल प्रभावी