advertisement

Animal Care: पावसाळ्यात प्राण्यांना त्वचेचे विकार होण्याचा धोका, संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय, Video

Last Updated:

पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण याच ऋतूमध्ये हवामानातील आर्द्रता आणि बदलामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. कुत्रा, मांजर, ससा यांसारख्या प्राण्यांना त्वचेचे विकार, अपचन, कानात संसर्ग आणि पायांमध्ये बुरशी होण्याचा धोका अधिक असतो.

+
News18

News18

बीड: पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण याच ऋतूमध्ये हवामानातील आर्द्रता आणि बदलामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. कुत्रा, मांजर, ससा यांसारख्या प्राण्यांना त्वचेचे विकार, अपचन, कानात संसर्ग आणि पायांमध्ये बुरशी होण्याचा धोका अधिक असतो. विशेषतः पावसात भिजणे आणि नंतर ओल्या शरीरासोबत उबदार जागेत न राहिल्यास हे त्रास वाढतात. बीड जिल्ह्यातील रोहित इंगळे या पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात प्राण्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
रोहित इंगळे सांगतात की, पावसाळ्यात प्राण्यांना नेहमी कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे. शक्यतो त्यांना पावसात न नेणे आणि भिजल्यास त्यांचं अंग नीटपणे कोरडे करणे गरजेचे आहे. दररोज आंघोळ घालणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचेवरचा नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो आणि संसर्ग वाढण्याचा धोका राहतो. प्राण्यांचे पाय आणि कान हे बुरशी आणि जीवाणूंसाठी संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांची नियमित स्वच्छता आवश्यक आहे.
advertisement
याशिवाय, वेळेवर लसीकरण केल्यास विविध संसर्गजन्य आजारांपासून प्राण्यांचे संरक्षण करता येते. पावसाळ्यात डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि त्वचाविकारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे लसीकरण, नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यांच्या आहारात पचनास सोपा आणि पोषणमूल्यांनी भरलेला आहार द्यावा.
advertisement
आजकाल अनेक प्राणीप्रेमी पाळीव प्राण्यांसाठी खास रेनकोट, चप्पल आणि अँटीसेप्टिक स्प्रे वापरत आहेत. हे केवळ त्यांना पावसाच्या पाण्यापासून वाचवत नाही, तर संसर्ग होण्याचा धोका देखील कमी करतात. प्राण्यांचे अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था नेहमी स्वच्छ ठेवावी. भिजलेले अन्न देणे टाळावे, कारण त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो.
advertisement
पाळीव प्राणी हे कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्यांची काळजी घेणे ही मालकाची जबाबदारी आहे. थोडी अधिक काळजी, थोडा अधिक वेळ आणि आवश्यक ती खबरदारी घेतल्यास प्राणी या ऋतूचा त्रास न घेता त्याचा आनंद लुटू शकतात, असं रोहित इंगळे सांगतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Animal Care: पावसाळ्यात प्राण्यांना त्वचेचे विकार होण्याचा धोका, संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय, Video
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement