Pregnancy : प्रेग्नंट बायकोला फिल्म पाहायला थिएटरमध्ये नेताय; आधी पुण्याच्या डॉक्टरांचा हा VIDEO पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnancy News : असं म्हणतात की बाळ पोटात असताना आई जे काही ऐकते त्याचा परिणाम बाळावरही होतो. थिएटरमध्ये आवाज इतका असतो की तिथं प्रेग्नंट महिलांनी फिल्म पाहणं योग्य आहे की नाही? असा प्रश्नही काही वेळा पडतो.
एखादी महिला प्रेग्नंट झाली की तिला खूश ठेवण्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रयत्न करतं. तिला काय हवं नको ते बघतं, तिला कशामुळे आनंद मिळेल याची काळजी घेतली जाते. ज्या ज्या गोष्टी तिला आनंदी ठेवतात त्या त्या सगळ्या केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे थिएटरला फिल्म दाखवणं. तुम्हीही तुमच्या बायकोला खूश करण्यासाठी थिएटरला फिल्म दाखवायला नेत असाल तर याबाबत डॉक्टर काय म्हणतात ते पाहा.
असं म्हणतात की बाळ पोटात असताना आई जे काही ऐकते त्याचा परिणाम बाळावरही होतो. त्यामुळे बऱ्या महिला प्रेग्नन्सीमध्ये एखादी चांगली फिल्मही पाहायला जातात. पण थिएटरमध्ये आवाज इतका असतो की तिथं प्रेग्नंट महिलांनी फिल्म पाहणं योग्य आहे की नाही? असा प्रश्नही काही वेळा पडतो. याबाबत पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता यांनी माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. श्वेता म्हणाल्या, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ अॅडव्हायसेजने प्रेग्नंट महिलांसाठी सुरक्षित आवाजाची मर्यादा दिलेली आहे. ती आहे 72 ते 115 डेसिबल. आपण सामान्यपणे बोलतो तो आवाज 60 ते 90 डेसिबलच्या मध्ये असतो. सगळ्या नियमांचं पालन करणाऱ्या थिएटरमध्ये 115 डेसिबलची मर्यादा ओलांडली जात नाही. त्यामुळे अशा थिएटरमध्ये जाऊन प्रेग्नंट महिला मुव्ही पाहू शकतात.
advertisement
आईच्या पोटात बाळाला खरंच बाहेरचे आवाज ऐकू येतात का?
याबाबत रिसर्च करण्यात आला. यात 20 पेक्षा जास्त प्रेग्नंट महिलांचा समावेश होता. 8 महिन्यांच्या या प्रेग्नंट महिलांसमोर काही खास आवाज काढण्यात आले. ज्यात बाळ बाहेरच्या आवाजांवर प्रतिक्रिया देत असल्याचं दिसलं.
advertisement
या संशोधनानुसार मुलं आठव्या महिन्यापासूनच बाहेरचा आवाज ऐकू शकतात असं म्हटलं आहे. या आवाजाने त्याच्या हृदयाच्या ठोक्यात बदल होतात, गर्भात त्याची थोडी हालचाल होऊ शकते.
याचा अर्थ जन्माआधीच मुलांची ऐकण्याची क्षमता विकसित होते. जन्मानंतर ती अधिक विकसित होते आणि हळूहळू मूल बोलायला शिकतं. या कालावधीत बाळ आईच्या अधिक जवळ असल्याने त्याला आईचा आवाज जास्त ओळखीचा असतो. त्यामुळे जन्मानंतर बाळ आईचा आवाज ओळखतो.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 13, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pregnancy : प्रेग्नंट बायकोला फिल्म पाहायला थिएटरमध्ये नेताय; आधी पुण्याच्या डॉक्टरांचा हा VIDEO पाहा


