Patenting Tips: तुमचं मुल तणावात आहे? वापरा ‘या’ सोप्या टिप्स् आणि करा त्यांना तणावामुक्त
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Patenting Tips: आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही एक मोठी समस्या झालीये. तरूण, प्रौढांप्रामणेच लहान मुलंही तणावाखाली आहेत. अभ्यास, विविध स्पर्धा परीक्षा पालकांच्या अपेक्षा या सगळ्याचा लहान मुलांच्या मनावर विपरीत परीणाम होताना दिसतोय. तुमचं मुलंही तणावात असेल तर आत्ताच या सोप्या टिप्स् वापरून त्यांना तणावातून बाहेर काढा.
मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही एक मोठी समस्या झालीये. असं नाहीये की फक्त तरूण किंवा प्रौढव्यक्ती तणावात आहेत. मात्र लहान मुलंही तणावाखाली दिसत आहे. अभ्यास, विविध स्पर्धा परीक्षा पालकांच्या अपेक्षा या सगळ्याचा लहान मुलांच्या मनावर विपरीत परीणाम होताना दिसतोय. त्यामुळे तुमचं मुलंही तणावात असेल तर आत्ताच या सोप्या टिप्स् वापरून त्यांना तणावातून बाहेर काढा.
जाणून घेऊयात मुलांना तणावातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी काय करायला हवं

advertisement
तुलना करणं टाळा
सर्वप्रथम, प्रत्येक पालकाने हे समजून घ्यायला हवं की बदलत्या काळानुरूप मुलांच्या सवयीही बदलतात आणि त्यामुळे तुमचं त्यांच्याप्रती असलेलं वागणंही बदलतं. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर तुमच्या पालकांनी तुम्हाला जसं वाढवलं तसं तुम्ही तुमच्या मुलांना वाढवू शकत नाही. त्यामुळे एकतर पहिल्यांदा तुम्ही तुलना करणं टाळा आणि बदलेल्या काळानुसार तुमच्या पालकत्वातही बदल करा.
advertisement
मुलांशी उघडपणे बोला
बऱ्याच पालकांचा असा गैरसमज असतो की, आपण आपल्या मुलांशी मनमोकळेपणे बोललो किंवा त्यांच्या मनाप्रमाणे वागलो किंवा त्यांच्याशी उघडपणे बोललो तर मुलं शेफारून जातील. ती आपलं सांगून ऐकणार नाही. त्यामुळे अनेक पालक मुलांशी नीट बोलत नाही किंवा मुलांचं म्हणणही नीट ऐकून घेत नाहीत. मात्र हे चुकीचं आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना समजून घ्यायला हवं. त्यांच्याशी उघडपणे बोलणं हे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. जेव्हा मुलं कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या पालकांशी गोष्टी शेअर करतात, तेव्हा त्यांना खूप सुरक्षित वाटतं. त्यामुळे पालकांनी कठोर वागण्याऐवजी आपल्या मुलांशी मित्रत्वाप्रमाणे, उघडपणे बोलायला हवं.
advertisement
मुलांवर दबाव टाकू नका
पालक अनेकदा आपल्या मुलांकडून आवाजवी अपेक्षा ठेवत असतात. त्यांना आपल्या मुलांना परिपूर्ण बनवायचं असतं यासाठी ते आग्रही करतात. त्यामुले अनेकदा मुलांच्या मनाविरूध्द वागून त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे बळजबरी केली जाते. मात्र अशा वागण्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो.
advertisement

मुलांचं कौतुक करा
मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींचं पालकांनी कौतुक करायला हवं जेणेकरून मुलांना उत्साह वाटेल. प्रत्येक मुलात काही चांगल्या आणि वाईट सवयी असतात. प्रत्येक मुल कोणत्या ना कोणत्या बाबतीत हुशार असतं. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक केलं की त्यांनाही हुरूप येईल जेणेकरून काही गोष्टी ते आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतील.
advertisement
अवाजवी अपेक्षा ठेवू नका
तुमच्या मुलांची कार्यक्षमता ओळखून त्यांच्याशी वागा. तुमच्या अपेक्षा त्यांना समजावून सांगा. अनेकदा पालक त्यांच्या मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. त्यामुळे मुलांमधला तणाव वाढतो. अनेकदा पालक मुलांनी अभ्यासात चांगले गुण मिळवण्यासाठी किंवा खेळात मेडल मिळवण्यासाठी त्यांच्यावर दबाब आणतात. मात्र हे अयोग्य आहे. मुलांच्या क्षमता ओळखून तुमच्या अपेक्षा ठेवा जेणेकरून तुमचाही हिरमोड होणार नाही आणि मुलांवर दबाब वाढणार नाही.प्रत्येक मूल हे वेगळं असते आणि त्याला त्याच्या आवडीनिवडीनुसार, प्राधान्यांनुसार वागण्याची संधी दिली मिळायला हवी. मुलांना स्वतःला ओळखण्याची आणि त्यांच्या त्यांच्या गतीने चालण्याची संधी दिल्याने मुलांची मानसिक स्थिती चांगली राहते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.
advertisement

आजकाल मोबाईल ही अनेकांची गरज बनली आहे. काहीवेळा लोकं जेवायला विसरतील मात्र मोबाईल बघायला विसरणार नाही असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं ठरणार नाही. मात्र हाच मोबाईल तुमच्या मुलांसाठी धोक्याचा ठरणार आहे. आजतर अगदी काही महिन्यांची मुलं मोबाईल फोनही पाहून दूध पिताना दिसतात. मोबाईल मिळाला नाही तर थयथयाट घालतात. मोबाईलच्या अतिवापराचा मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर, सामाजिक कौशल्यांवर आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे फक्त मुलांच्या डोळ्यांवरच नाही तर त्यांच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होऊन त्यांचं मानसिक आरोग्यावर धोक्यात येतंय. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना फार वेळ मोबाईल फोन देणं टाळावं आणि जर द्यायचाच असेल तर एका ठराविक वेळेसाठीच द्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2024 7:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Patenting Tips: तुमचं मुल तणावात आहे? वापरा ‘या’ सोप्या टिप्स् आणि करा त्यांना तणावामुक्त





