advertisement

कामाच्या ठिकाणी घेऊ शकता डुलकी? वर्किंग प्रोफेशनलचं यावर काय आहे म्हणणं?

Last Updated:

कार्यालयात काम करणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले की ते कामाच्या दरम्यान झोप घेतात का?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 17 डिसेंबर : अलीकडेच नारायण मूर्ती यांच्या एका विधानामुळे बराच वाद पेटला होता. तरुणांना आठवड्यातून 10 तास काम करण्यास सांगितले, त्यांचं हे वक्तव्य अनेकांना पटलेलं नाही, ज्यामुळे अनेकांनी याला विरोध केला, तर सोशल मीडियावर यासंदर्भात मीम्स देखील पाहायला मिळाले.
यानंतर, बिल गेट्सकडून एक विधान आले ज्यामध्ये त्यांनी AIच्या युगात आठवड्यातून तीन दिवस काम करण्याविषयी म्हटले होते. खरंतर अनेक लोकांसाठी आदर्श असलेल्या अशा या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी ही विधानं दिली आहेत, जी अगदी एकमेंकांच्या विरुद्ध टोकाची आहेत.
यासंदर्भात अनेक प्रश्न आणि मुद्दे समोर आले, त्यांपैकी एक म्हणजे ऑफिसमध्ये डुलकी घेणे.
ऑफिसमध्ये डुलकी घेणे चांगले की वाईट?
कार्यालयात काम करणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले की ते कामाच्या दरम्यान झोप घेतात का? यावर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी हे मान्य केलं की ते कामाच्या ठिकाणी डुलकी घेतात. यामुळे थकवा दूर होऊन त्यांची काम करण्याची क्षमता वाढते आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते.
advertisement
जीनियस कन्सल्टंटने सर्वेक्षण केले
जीनियस कन्सल्टंट या एम्प्लॉई सोल्युशन्स आणि ह्युमन रिसोर्स सेवा देणाऱ्या कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. जिनियस कन्सल्टंटने सर्वेक्षणानंतर एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की जपानमध्ये 'इनेमुरी' ची प्रथा बर्‍याच काळापासून सुरू आहे, ज्यामध्ये कामाच्या वेळी झोप घेणे देखील समाविष्ट आहे.
निरोगी कार्य संस्कृतीसाठी हे करणे आवश्यक असल्याचे जिनियस कन्सल्टंटने अहवालात म्हटले आहे. सर्वेक्षण केलेल्या सुमारे 94 टक्के कर्मचार्‍यांचे मत आहे की कामाच्या दरम्यान झोप घेणे आवश्यक आहे. याला केवळ 3 टक्के लोक असहमत आहेत.
advertisement
अहवालात पुढे म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांमध्ये विश्रांती हवी आहे, जेणेकरून तणाव कमी करता येईल. विविध व्यवसाय आणि संस्थांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. बँकिंग ते अभियांत्रिकी, शिक्षण ते आयटी आणि मीडिया ते लॉजिस्टिक या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कामाच्या ठिकाणी घेऊ शकता डुलकी? वर्किंग प्रोफेशनलचं यावर काय आहे म्हणणं?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement