गूळ की साखर? गोडासाठी कशाचा करायचा वापर, आरोग्यासाठी काय चांगलं?

Last Updated:

Jaggery vs. Sugar : बरेच लोक साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला देतात. पण गूळ आणि साखर दोन्ही उसापासून बनवले जातात. मग गूळ खरोखरच साखरेला पर्याय असू शकतो का?

News18
News18
नवी दिल्ली : आजकाल लोकांचा हेल्दी खाण्याकडे कल असतो. अनेक लोक डायबेटिजसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे जास्त गोड खाण्यावर कंट्रोल ठेवला जातो. किंबहुना गोडाला पर्यायी गोष्टींचं सेवन केलं जातं. सामान्यपणे साखर वाईट आणि गूळ चांगलं असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचं सेवन करतात. पण गूळ आणि साखर दोन्ही उसापासून बनवले जातात. तर गूळ खरोखरच साखरेला पर्याय असू शकतो का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
गूळ आणि साखर दोन्ही उसापासून बनवले जातात पण तरीही आजकाल अनेक सेलिब्रिटी आणि लोक यांचा गूळ खाण्याकडे जास्त कल आहे. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे उसावर अनेक प्रक्रिया करून साखर तयार केली जाते. गुळाच्या बाबतीत असं नाही, गूळ नैसर्गिकरित्या बनवला जातो. म्हणूनच ते चांगलं मानलं जातं. पण गूळ आणि साखर यांच्यात हेल्दी काय? साखरेला गूळ पर्याय असू शकतो का? याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या आहारतज्ज्ञ मंजू माथळकर यांनी लोकल18ला माहिती दिली आहे.
advertisement
साखर चांगली की गूळ?
साखरेमध्ये भरपूर कॅलरीज असतात, पण गुळामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील असतं आणि ते शरीराला ऊर्जा देखील देतं. गूळ खाताना ते नैसर्गिक आहे की नाही आणि ते कसं बनवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. साखरेपेक्षा चांगला असूनही गूळ जास्त प्रमाणात सेवन करू नये. जर तुम्ही जास्त प्रमाणात गूळ सेवन केलं तर ते तुमचं वजन वाढवू शकतं आणि मधुमेह देखील होऊ शकतं. यासोबतच, शरीरातील कॅलरीज देखील वाढू शकतात. म्हणून, मर्यादित प्रमाणात ते सेवन करणं महत्त्वाचं आहे.
advertisement
मधुमेहींनी गूळ खावा का?
आहारतज्ज्ञ मंजू माथळकर म्हणाल्या की, मधुमेह असलेल्या लोकांनी साखरेप्रमाणेच गुळाचं सेवन करणं टाळावं. गूळ खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. गुळाचं सेवन शरीरासाठी हानिकारक देखील असू शकतं. त्यामुळे मधुमेहींनीही गूळ टाळावा. तसंच, इतर लोकांनीही साखरेप्रमाणेच कमी प्रमाणात गूळाचं सेवन करावं. दरम्यान, साखरेपेक्षा गूळ खाणं नेहमीच चांगलं असतं, पण गूळ खाताना ते नैसर्गिक किंवा सेंद्रीय पद्धतीने बनवलेले आहे याची खात्री करा आणि ते मर्यादित प्रमाणात खा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गूळ की साखर? गोडासाठी कशाचा करायचा वापर, आरोग्यासाठी काय चांगलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement