advertisement

BTS च्या जंगकुकला आवडतो 'हा' भारतीय पदार्थ, नाव काढताच लागते भूक! लाईव्ह स्ट्रीमवर स्वतःच सांगितलं

Last Updated:

Jungkook Indian Food Love : आपल्या जादुई आवाजाने संपूर्ण जगाला भुरळ घालणारा जंगकुक सध्या त्यांच्या ‘देसी’ चवीमुळे चर्चेत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं! ग्लोबल पॉप स्टार जंगकुक आता भारतीय पदार्थांचा चाहता झाला आहे.

20 मार्चला होणार आहे धमाका..
20 मार्चला होणार आहे धमाका..
मुंबई : जर तुम्ही खरे BTS फॅन्स असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आपल्या ‘जंगकुक (BTS Jungkook)’ ला म्युझिकनंतर सर्वात जास्त प्रिय आहे ते जेवण! आपल्या जादुई आवाजाने संपूर्ण जगाला भुरळ घालणारा जंगकुक सध्या त्यांच्या ‘देसी’ चवीमुळे चर्चेत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं! ग्लोबल पॉप स्टार जंगकुक आता भारतीय पदार्थांचा चाहता झाला आहे.
जंगकुकचं पिझ्झावरचं प्रेम तर सगळ्यांनाच माहीत आहे. ब्रेकफास्ट असो किंवा डिनर, तो कधीही पेपरोनी पिझ्झासाठी ‘YES’ म्हणू शकतो. लॉकडाऊनमध्ये तर त्याने स्वतः पिझ्झा मास्टर बनून सगळ्यांना चकित केलं होतं. (MBC Radio’s Bae Cheol Soo’s Music Camp) दरम्यान त्यांने खुलासा केला होता की लॉकडाऊनमध्ये त्यांने स्वयंपाक करून पाहिला होता. त्यांने सांगितलं की तो घरी पिझ्झा बनवायला शिकला आणि पिझ्झा बनवणं आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सोपं आहे, हे जाणून त्याला आश्चर्य वाटलं.
advertisement
पण आता गोष्ट फक्त पिझ्झापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. एका लाईव्ह स्ट्रीमदरम्यान जंगकुकने जेव्हा भारतीय जेवणाचा, विशेषतः चिकन मखनी आणि नानचा उल्लेख केला, तेव्हा देसी चाहत्यांचं मन आनंदलं. त्याचा हा फूड-अ‍ॅडव्हेंचर दाखवतो की, तो नवे पदार्थ चाखण्यापासून कधीच मागे हटत नाहीत.
20 मार्चला होणार आहे धमाका..
फूडसोबतच आता जंगकुक आपल्या कामावरही परत येत आहे. 20 मार्च रोजी BTS आपला 5वा फुल-लेंथ अल्बम रिलीज करणार आहे, ज्यामध्ये 14 अशी गाणी असतील, जी थेट तुमच्या मनाला भिडतील. या अल्बममध्ये BTS चा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या चाहत्यांसोबतचा खोल संबंध दाखवण्यात आला आहे. अलीकडेच जंगकुकने आपल्या हाताने लिहिलेल्या पत्रात चाहत्यांप्रती आपलं प्रेम व्यक्त करत, कमबॅकसाठी आपण खूप उत्सुक असल्याचं सांगितलं.
advertisement
BTS म्हणजे काय?
BTS हा दक्षिण कोरियातील एक प्रसिद्ध सात सदस्यांचा म्युझिक बँड आहे. या बँडमध्ये आरएम, जिन, सुगा, जे-होप, जिमिन, व्ही आणि जंगकुक हे सात सदस्य आहेत. 2013 मध्ये सुरू झालेल्या या बँडने आपल्या गायन आणि नृत्याने आज संपूर्ण जगाला वेड लावलं आहे.
BTS लोकप्रिय होण्यामागचं मोठं कारण म्हणजे, त्यांच्या गाण्यांचे बोल, जे तरुणांच्या अडचणी, मानसिक आरोग्य आणि स्वतःवर प्रेम करण्याबद्दल बोलतात. त्यांच्या चाहत्यांना संपूर्ण जगात ‘ARMY’ म्हणून ओळखलं जातं. या ग्रुपने केवळ मोठमोठे म्युझिक अवॉर्ड्सच जिंकले नाहीत, तर आपल्या सकारात्मक विचारांमुळे जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्थानही ठरले आहेत. (Image: Instagram- JUNGKOOK updates)
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
BTS च्या जंगकुकला आवडतो 'हा' भारतीय पदार्थ, नाव काढताच लागते भूक! लाईव्ह स्ट्रीमवर स्वतःच सांगितलं
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement