Benefits of Dry Coconut: सुक्या खोबऱ्याचे आहेत इतके फायदे; महिलांनी दररोज का खायला हवं सुकं खोबरं? फायदे जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

Last Updated:

Dry Coconut for women: दररोज संसाराचा गाडा हाकताना महिलांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. शारीरिक आणि मानसिक ताणापासून महिलांना स्वत:ला दूर ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी सुकं खोबरं हे एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. दररोज सुकं खोबरं खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

प्रतिकात्मक फोटो : महिलांनी रोज खायला हवं सुकं खोबरं, होतील अनेक फायदे,
प्रतिकात्मक फोटो : महिलांनी रोज खायला हवं सुकं खोबरं, होतील अनेक फायदे,
Dry Coconut for women:  ‘देवाची करणी आणि नाराळात पाणी’ अशी म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नारळाच्या झाडामुळे अनेक फायदे होत असल्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं. जसे नारळाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत तसेच फायदे हे नारळातून मिळणाऱ्या खोबऱ्याचे सुद्धा आहेत. खोबरं हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. ओलं खोबरं आपण अनेकदा खातो. कधी देवळातला प्रसाद तर कधी भाजीत. ओल्या खोबऱ्यामुळे मसालेभाताचं सौंदर्यं वाढतं. मात्र आज जाणून घेऊयात सुक्या खोबऱ्याचे किती फायदे आहेत.
 ‘देवाची करणी आणि नाराळात पाणी’ अशी म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नारळाच्या झाडामुळे अनेक फायदे होत असल्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं. जसे नारळाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत तसेच फायदे हे नारळातून मिळणाऱ्या खोबऱ्याचे सुद्धा आहेत. खोबरं हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. ओलं खोबरं आपण अनेकदा खातो. कधी देवळातला प्रसाद तर कधी भाजीत. ओल्या खोबऱ्यामुळे मसालेभाताचं सौंदर्यं वाढतं. मात्र आज जाणून घेऊयात सुक्या खोबऱ्याचे किती फायदे आहेत.

स्त्रियांसाठी फायदेशीर आहे सुकं खोबरं (Dry Coconut Benefits for women)

advertisement
दररोज संसाराचा गाडा हाकताना महिलांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. जर ती स्त्री नोकरी करणारी असली की मग संपलंच. घर आणि ऑफिस यांची सांगड घालताना सततची कामं, शारीरिक आणि मानसिक  ताण, यामुळे महिलांचं स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्षच होत राहतं. ज्याची परिणीती गंभीर आजारात होते. त्यामुळे अनेक त्रासांपासून महिलांना स्वत:ला दूर ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी सुकं खोबरं हे एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. दररोज सुकं खोबरं खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर (Dry Coconut Benefits During Pregnancy)

गरोदरपणात सुकं खोबरं खाल्ल्यामुळे अनेक फायदे होतात. खोबऱ्यात असलेलं फॅटी ॲसिड फक्त महिलांसाठीच नाही तर पोटातल्या गर्भाच्या वाढीसाठी फायद्याचं ठरतं. खोबऱ्यामुळे गरोदर महिलांची प्रतिकारशक्ती वाढते.
advertisement

मूत्र मार्गातील संसर्ग टाळण्यासाठी फायदेशीर (Dry Coconut benefits on Urine Infection)

महिलांना युरिन इन्फेक्शन म्हणजेच (UTI) चा त्रास आता सामान्य बाब झालीये. ज्या महिलांना वारंवार युटीआयचा त्रास होतो अशा महिलांनी सुकं खोबरं खाणं फायद्याचं आहे. सुक्या खोबऱ्यात असलेले पोषक घटक शरीरात खराब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्यामुळे UTI सारख्या गंभीर समस्यांना दूर ठेवता येऊ शकतं.
advertisement
Dry Coconut for Women: महिलांनी रोज खायला हवं सुकं खोबरं, होतील अनेक फायदे

संधिवातावर परिणामकारक (Dry Coconut For Arthritis)

वयाच्या तिशीनंतर अनेक महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते त्यामुळे सांधेदुखीचा  त्रास सुरू होतो. कधीकधी या त्रासाचं रूपांतर संधिवातासारखा गंभीर आजारातही होतं. त्यामुळे ज्यांना (महिला / पुरूष) संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुकं खोबरं अमृतासमान आहे. खोबऱ्यातल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
advertisement

रक्तवाढीस फायद्याचं (Dry Coconut On Heart Attack)

सुक्या नारळात अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातल्या रक्ताचं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढंत.पुरेशा प्रमाणात रक्त असल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. सुकं खोबरं खाल्ल्याने हार्ट ॲटॅक, किंवा ब्लॉकेजेसचा धोका टाळता येतो.
advertisement

त्वचेसाठी फायदेशीर (Dry Coconut For Skin Care)

कोरडी त्वचा असणाऱ्यांनी सुक्या खोबऱ्याचं नियमित सेवन करायला हवं. खोबऱ्यात असलेलं तेल आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. हे तेल तुमच्या त्वचेला आवश्यक पोषण देते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहून ती मुलायम आणि तजेलदार बनते. खोबऱ्याच्या सेवनामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Dry Coconut: सुक्या खोबऱ्याचे आहेत इतके फायदे; महिलांनी दररोज का खायला हवं सुकं खोबरं? फायदे जाणून बसेल आश्चर्याचा धक्का
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement