Curry leaves benefits: ‘इतक्या’ आजारांवर गुणकारी आहेत 'ही' हिरवी पानं, नियमित सेवनामुळे दूर पळतील अनेक आजार

Last Updated:

Health benefits Curry leaves in Marathi: कढीपत्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन अ,ब आणि क याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहसारखी खनिजं आढळून येतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून रक्षण करता येतं.

News18
News18
मुंबई: कढीपत्ता... आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा. अगदी फराळाच्या चिवड्यापासून ते अनेक भाज्या आणि पुलाव किंवा बिर्याणीमध्ये हमखास आढळून येणारा एक घटक. आपल्या सगळ्यांसाठी कढीपत्ता हा एक शोभेचा, अन्नपदार्थांची चव वाढवणारा घटक जरी असला तरीही कदाचीत या कढीपत्त्याचे आरोग्यदायी गुणधर्म अनेकांना माहिती नसतील. कढीपत्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन अ,ब आणि क याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहसारखी खनिजं आढळून येतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून रक्षण करता येतं. याशिवाय पोटाच्या आजारापासून ते हृदयरोगासारख्या गंभीर आजारांवरही कढीपत्त्याच्या पानांचं सेवन फायद्याचं ठरतं.
जाणून घेऊयात कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे.

पोटाच्या आजारांवर गुणकारी:

एका अहवालानुसार, कढीपत्त्यामध्ये पाचक गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहायला मदत होते. कढीपत्त्याचं सेवन केल्यानमुळे अपचन, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. कढीपत्त्यामध्ये असे अनेक घटक असतात जे आतडं आतून स्वच्छ करतात. त्यामुळे आपसूकच आतड्यांचे स्नायू मजबूत होऊन आतड्यांचं कार्य सुधारतं. यामुळे पोटफुगी, अपचन आणि गॅसेसच्या समस्या दूर होतात. तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचा रस काढून तो पिऊ शकता किंवा कढीपत्त्याची पानं हलकीशी भाजून ती चावून खाऊ शकता. किंवा पानं वाळवून पावडर बनवू शकता. विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये कढीपत्त्याची पानं टाकून त्यांचं सेवन करता येऊ शकतं.
advertisement

हृदयासाठी वरदान :

कढीपत्त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
ठरतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनानमुळे रक्तवाहिन्या आतून स्वच्छ व्हायला मदत होते. रक्तवाहिन्यांमधला अडथळा दूर झाल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदरोगांचा धोका टाळता येतो. याशिवाय चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून वाईट कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित राहतो.
Health benefits Curry leaves in Marathi: ‘इतक्या’ आजारांवर गुणकारी आहेत ही हिरवी पानं, नियमित सेवनामुळे दूर पळतील अनेक आजार
advertisement

मधुमेहींसाठी फायद्याचा कढीपत्ता :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पाने फायदेशीर ठरू शकतात. कढीपत्त्यामध्ये अँटी-हायपरग्लाइसेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. कढीपत्ता शरीरातील चयापचय वाढवतं. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. त्यामुळे शरीरातील साठलेली चरबी जळून पोटांभोवती वाढलेला घेर कमी होतो. कढीपत्त्यामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात, जे शरीराला बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करतात.याशिवाय एखादी जखम झाली असेल तर त्या जखमेवर कढीपत्त्याच्या पानांचा रस लावला तर ती जखम लवकर भरून यायला मदत होते.
advertisement

केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर :

कढीपत्त्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर घटक असतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने त्वचेला पोषण मिळतं त्वचा तरुण आणि तजेलदार राहायला मदत होते. कढीपत्ता खाल्ल्याने मुरुमं आणि त्वचेशी संबंधित इतर त्रासांपासून मुक्तता मिळते. कढीपत्त्याचा पानांचा रस काढून तो चेहऱ्यावर फेस पॅक प्रमाणे लावल्यास त्वचा उजळून निघते. वयोमानाप्रमाणे येणाऱ्या सुरकुत्यांचं प्रमाणही कमी होतं. कढीपत्त्याचे सेवन हे केसांच्या आरोग्यासाठी देखील फायद्याचं ठरतं. कढीपत्त्यात असलेल्या अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वांमुळे केसांची मुळं मजबूत होईल केस झडण्याची समस्या कमी होऊन केसांना चांगली चमकही येते.
advertisement

मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर:

कढीपत्त्यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स मेंदूच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. मानसिक थकवा दूर करण्यास, ताण कमी करण्यास किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी कढीपत्ता फायद्याचा ठरतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Curry leaves benefits: ‘इतक्या’ आजारांवर गुणकारी आहेत 'ही' हिरवी पानं, नियमित सेवनामुळे दूर पळतील अनेक आजार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement