छान असे लेदर शूज बनवून हवेत, मुंबईतील याठिकाणी नक्की भेट द्या, पैसा वसूल लोकेशन!
- Reported by:Pratikesh Patil
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
best leather shoes shop in mumbai - राजू माने यांचे हे चार पिढ्यांपासून लेदर शूजचे दुकान आहे. ते हाताने लेदरचे शूज बनवून देतात. यांच्याकडे प्युअर सोल आणि लेदर सोल अशा दोन प्रकारचे सोल असतात. पण प्युअर सोलचे शूज जास्त प्रमाणात बनतात.
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई - सर्वांनाच ऑफिसमध्ये आणि कार्यक्रमासाठी जाण्यासाठी एकदम टापटीप आणि डिझाईन शुज लागतात आणि बरोबर मापामध्ये बसणारे डिझाईनिंग शूज पाहिजे असतात. जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की लेदरचे शूज कुठे बनवून भेटतात, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईत लेदर शूज कुठे बनवून मिळतात, हे जाणून घेऊयात.
advertisement
मुंबईतील प्रॉफिट मार्केट येथे मुंबई कमिशनर ऑफीस जवळ गेट नंबर 4 जवळ असणारे माने शूज मार्ट हे दुकान आहे. राजू माने यांचे हे चार पिढ्यांपासून लेदर शूजचे दुकान आहे. ते हाताने लेदरचे शूज बनवून देतात. यांच्याकडे प्युअर सोल आणि लेदर सोल अशा दोन प्रकारचे सोल असतात. पण प्युअर सोलचे शूज जास्त प्रमाणात बनतात.
advertisement
Satara : शेतीची आवड, प्राचार्य पदाचा राजीनामा, तैवान पिंक पेरुतून घेतले लाखोंचे उत्पन्न
या ठिकाणी ऑर्डरप्रमाणे, डिझाईन प्रमाणे लोकांना शूज बनवून मिळतात. सगळ्या साईजचे शूज या दुकानात बनवून मिळतात. ऑर्डर दिल्यानंतर 15 ते 18 दिवसानंतर हे शूज तुम्हाला मिळतील. येथे ओरेजनल शूज अगदी 1500 रुपयापासून सुरुवातीपासून ते 4500 ते 5000 पर्यंत मिळतात.
advertisement
जर तुम्ही लेदर सोल वाले शूज घेतलात तर तुम्हाला 3500 हजारांपासून मिळतील. जर तुम्हाला विविध डिझाईन असणाऱ्या ओरिजनल लेदरचे हाताने बनवलेले शूज पाहिजे असतील मुंबईतील प्रॉफिट मार्केट येथील माने शूज मार्टला नक्की भेट देऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 24, 2024 6:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
छान असे लेदर शूज बनवून हवेत, मुंबईतील याठिकाणी नक्की भेट द्या, पैसा वसूल लोकेशन!








