advertisement

Most Expensive Rice : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, विकला जातो हजारो रुपयांमध्ये! यात असं काय आहे?

Last Updated:

Most expensive rice in the world : हा तांदूळ 2016 मध्ये जगातील सर्वात महागडा तांदूळ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला होता. त्याही किंमत जितकी आश्चर्यकारक आहे. तितकीच वेगळी आणि अनोखी त्याची लागवडीची प्रक्रिया आणि चव आहे.

जगातील सर्वात महागडा तांदूळ
जगातील सर्वात महागडा तांदूळ
मुंबई : ऑरगॅनिक भाज्या, फळं आणि धान्यांची वस्तूंची किंमत जास्त आहे. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोक ते घेणे पसंत करता. कारण याचे आपल्या शरीराला निव्वळ फायदेच होतात. पण तुम्हाला माही आहे? एक असा तांदूळ आहे जो जगातील सर्वात महागडा आहे आणि त्याची किंमत हजारोच्या घरात आहे. चला जाणून घेऊया या तांदळाचे वैशिठ्य..
सीएनएनच्या मते, जपानचा 'किनमेमाई प्रीमियम' तांदूळ 2016 मध्ये जगातील सर्वात महागडा तांदूळ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला होता. त्याही किंमत जितकी आश्चर्यकारक आहे. तितकीच वेगळी आणि अनोखी त्याची लागवडीची प्रक्रिया आणि चव आहे. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत आहोत.
आजतकच्या एक वृत्तानुसार, 840 ग्रॅमच्या एका बॉक्सची किंमत सुमारे 10,800 जपानी येन किंवा अंदाजे 6,000-7,000 रुपये आहे. विक्रीला आल्यानंतर त्याची किंमत सुमारे 9,496 येन किंवा अंदाजे 9,872 रुपये प्रति किलोग्रॅम असते. आता विविध बाजारपेठांमध्ये 12,500-15,000 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीला हा तांदूळ उपलब्ध आहे.
advertisement
या कारणाने महाग असतो हा तांदूळ..
किनमेमाई प्रीमियम तांदूळ जपानी कंपनी 'टोयो राईस कॉर्पोरेशन'द्वारे उत्पादित तांदूळ आहे. तो अजिबात सामान्य नाही. कारण हा तांदूळ पाच वेगवेगळ्या प्रीमियम प्रकारांचे मिश्रण आहे. त्यात कोशिहिकारी आणि पिकामारू सारख्या पुरस्कार विजेत्या तांदळाच्या जाती आहेत. हे बियाणे जपानच्या उत्तम प्रदेशांमधून निवडले जातात. हा तांदूळ उगवण्यासाठी खूप वेलागतो. म्हणून त्याच्या दीर्घ प्रक्रियेमुळे किंमत जास्त आहे.
advertisement
शिवाय कापणीनंतरही हा तांदूळ लगेच बाजारात आणला जात नाही. सहा महिन्यानंतर तो बाजारात येतो. कंपनीचा दावा करते की, या सहा महिन्यांच्या वयामुळे तांदळाची चव आणि पोत वाढते. तसेच पेटंट केलेले "बफिंग" तंत्रज्ञान नंतर बाह्य थर काढून टाकते, ज्यामुळे त्याचे पोषक घटक टिकतात.
कशी असते या तांदळाची चव?
सीएनएनच्या अहवालानुसार, शिजवल्यावर हा तांदुळ खूप चमकतो. चवीला हा नियमित तांदळापेक्षा खूपच गोड आणि पौष्टिक असतो. या तांदळाचे उत्पादन खूपच मर्यादित असते. म्हणजे कंपनी दरवर्षी या तांदळाच्या फक्त 1,000 पेट्या तयार करण्याचा दावा करते. प्रत्येक पेटीत 140 ग्रॅम वजनाचे सहा लहान पॅकेट असतात. जपानमध्ये ती एक महागडी आणि खास भेटवस्तू मनाली जाते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Most Expensive Rice : 'हा' आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, विकला जातो हजारो रुपयांमध्ये! यात असं काय आहे?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement