आईचं स्वप्न असं केलं साकार, इमिटेशन ज्वेलरीतून तरुण मालामाल, कमाई किती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांनी यश मिळतेच.त्यामध्येही परिस्थीती हलाखीची असतानाही आपले उच्च शिक्ष पूर्ण करून आईचे स्वप्न पुढे साकारण्याची धमक दिपक जैन या तरुणाने ठेवली आणि एक नवीन प्रवासाला चालना देवून त्याने इंतीमेशन ज्वेलरी च कामकाज शिकून आज महिना लाखोच्या घरात कमाई करून स्वतःचे शॉप उभे केले आहे
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई: आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांना यश मिळतंच. हेच मुंबईतील एका तरुणानं खरं करून दाखवलंय. मुलानं काहीतरी करून स्वत:च्या पायावर उभं राहावं, असं आईचं स्वप्न होतं. आईच्या निधनानंतर मुलगा दीपक मोडीलाल जैन यानं जिद्दीनं हे स्वप्न साकार केलं. स्वत:चा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय त्यानं सुरू केला असून महिन्याला लाखोची कमाई तो या व्यवसायातून करत आहे.
advertisement
दीपक यांच्या आईचं सन 2018 मध्ये निधन झालं. मुलानं शिकून आपल्या पायावर उभं राहावं हे आईचं स्वप्न होतं. त्यासाठी दीपक यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आणि इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचं काम शिकले. त्यानंतर 4 वर्षांपूर्वी चेंबूर स्टेशन ईस्ट पासून 2 मिनिटांच्या अंतरावर नटराज सिनेमाच्या जवळ ‘ए वन गोल्ड’ नावाने दुकान सुरू केलं. परिस्थितीवर मात करत हे दुकान वाढवलं आणि आईचं स्वप्न साकार केलं.
advertisement
इमिटेशन ज्वेलरीला मोठी मागणी
“माझ्या दुकानात 1 ग्राम गोल्ड, इमिटेशन गोल्ड प्लेटेड ज्वेलरी असे ज्वेलरीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यांची किंमत फक्त 200 रुपयांपासून सुरू होते. तर अमेरिकन डायमंडचे दागिने 10 हजार रुपयांपर्यंत मिळतात. यामध्ये विविध व्हरायटी आणि डिझाईन देखील उपलब्ध आहेत. यामध्ये झुमका, हार, मंगळसूत्र, बांगडी असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यातून महिन्याला 1 लाख तर वर्षाकाठी 12 ते साडेबारा लाखांपर्यंत कमाई होते,” असं जैन सांगतात.
advertisement
शिक्षण घेत सुरू केलं दुकान
सध्याच्या काळात सोन्या-चांदीचे दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे इमिटेशन ज्वेलरी हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी मी इमिटेशन ज्वेलरीचं दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. आईला दागिने आवडायचे. तिचं देखील असं दुकान सुरू करण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे या व्यवसायाकडे शिक्षण घेत असतानाच वळलो. हा व्यवसाय उभा करताना अनेक संकटे आली आणि त्याला मी सामोरं गेलो. त्यासाठी अनेकांनी मदत देखील केली. तरीही आज मला जे व्यवसायात यश मिळतेय त्याचे श्रेय आईचे असल्याचे दीपक सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 16, 2025 3:58 PM IST