मुंबईच्या रस्त्यावर धावतेय कपड्यांचे दुकान, पाहा कसा आहे क्लोथ ट्रक? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोविड काळात दबडे यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय ठप्प झाला. तेव्हा त्यांनी कपड्यांचा ट्रक तयार करुन घेतला.
लतिका तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई: सध्याच्या काळात बहुतेक ठिकाणी आपल्याला फ़ूडट्रक सुरू झालेले पाहायला मिळतील. पण एखाद्या वाहनावर फक्त खाण्याच्या पदार्थांचाच व्यवसाय होऊ शकतो असे नाही. सध्या छोटे-मोठे व्यवसाय करणारे उद्योजक एखाद्या वाहनात आपला व्यवसाय सुरू करतात. मुंबईतील रस्त्यांवर असंच एक कपड्यांचं दुकान धावत आहे. संदीप दबडे यांनी हा क्लोथट्रक सुरू केला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होतेय.
advertisement
अडीच वर्षांपासून सुरू आहे क्लोथ ट्रक
मुंबईच्या करीरोड स्टेशन परिसरात जिथे फ़ूडट्रक प्रमाणेच एक कपड्यांचा ट्रक आहे. कोकण फॅशन असे या क्लोथट्रकचे नाव आहे. या ट्रकवर महिलांचे कुर्ती व इन्नरगारमेंटस् फक्त 200 ते 250 रुपयांत खरेदी करता येईल. या ट्रकचा पूर्ण सेटअप हा एखाद्या कपड्याच्या दुकानांप्रमाणेच आहे. या ट्रकचे मालक संदीप दबडे हे गेल्या अडीच वर्षापासून हा व्यवसाय करत आहेत.
advertisement
कसा सुरू केला व्यवसाय?
कोविड काळात दबडे यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी कपड्यांचा ट्रक तयार करुन घेतला. महिंद्रा जीतो नामक टॅम्पोवर त्यांनी अगदीच एखाद्या दुकानाप्रमाणे कपडे ठेवण्याची व्यवस्था करून घेतली. हा ट्रक तयार करण्यासाठी त्यांना सेकंड हैंड टॅम्पो व त्याच्यावर फेब्रिकेशन करण्यासाठी 6 लाखांचा खर्च लागला. पण वन टाइम इन्वेस्टमेंटसाठी करून असा व्यवसाय करणे अतिशय फायदेशीर आहे, असे पाठक सांगतात.
advertisement
चालतं-फिरतं दुकान
कपड्यांच्या दुकानाच्या तुलनेत खूप कमी खर्चात क्लोथ ट्रक तयार होतो. आपल्याला कुठल्याही प्रकारचे भाडे कोणाला द्यायचे नसते. स्मॉल लाइटवर उत्तम प्रकाश पडतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे वीज बिल आपल्याला भरायचे नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो ट्रक चालता फिरता असेल तर आपण आपला सेटअप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. त्याचा खूप फायदा होत असल्याचे, संदीप यांनी सांगितले.
advertisement
कोणत्या कपड्यांची विक्री?
या ट्रकवर महिलांची कुर्ती व इन्नरगरमेंटस् फक्त 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळतात. तसेच या ठिकाणी शॉर्ट कुर्ती 200 रुपयांत मिळतील. लाँग कुर्ती 300 ते 350 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच 700 रुपयांत ड्रेस सेट उपलब्ध आहे. महिलांचे त्याचप्रमाणे माणसांचे ब्रॅंडेड इन्नरगरमेंटस् देखील या ठिकाणी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. दुकान, जागा, लाईट यांचा खर्च नसल्याने कपडे स्वस्तात विकणे परवडते, असेही संदीप पाठक सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2024 1:41 PM IST