advertisement

Human Body : शरीरात रोज नवीन रक्त तयार होतं, मग जुनं रक्त कुठे जातं?

Last Updated:

मानवाच्या शरीरात दिवसभरात इतक्या सगळ्या गोष्टी सुरु असतात ज्याविषयी आपल्याला स्वतःलाच माहित नसतं. यातील एक गोष्ट म्हणजे 'रक्त'. आपल्या शरीरात रोज नवीन रक्त तयार होतं. अशा परिस्थितीत मग आपलं जुनं रक्त कुठे जातं? याविषयी तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना माहिती नसेल.

 शरीरात रोज नवीन रक्त तयार होतं, मग जुनं रक्त कुठे जातं?
शरीरात रोज नवीन रक्त तयार होतं, मग जुनं रक्त कुठे जातं?
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : मानवाचं शरीर हे खूप आश्चर्यकारक आहे. कारण मानवाच्या शरीरात दिवसभरात इतक्या सगळ्या गोष्टी सुरु असतात ज्याविषयी आपल्याला स्वतःलाच माहित नसतं. यातील एक गोष्ट म्हणजे 'रक्त'. आपल्या शरीरात रोज नवीन रक्त तयार होतं. अशा परिस्थितीत मग आपलं जुनं रक्त कुठे जातं? याविषयी तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना माहिती नसेल. याविषयी जाणून घेऊया.
रक्त हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय माणूस जगू शकत नाही. रक्त आपल्या शरीरातील छोट्यातल्या छोट्या भागांपर्यंत पोहोचत असतं. जेव्हा आपण काही खातो किंवा पितो तेव्हा आपले शरीर हे अन्न शोषून घेतं आणि हाडांपर्यंत पोहोचवतं. येथूनच रक्त तयार करण्याचं काम सुरू होतं.
हाडांमध्ये लाल अस्थिमज्जा भरलेला असतो, तो लाल रक्तपेशी निर्माण करतो. खरं तर, अस्थिमज्जाच्या आत, सर्व रक्तपेशी स्टेम सेल नावाच्या विशेष पेशीपासून बनवल्या जातात. जेव्हा स्टेम सेलचे विभाजन होतं, तेव्हा लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी किंवा प्लेटलेट पेशी बनते.
advertisement
शरीर रोज नवीन रक्त बनवतं पण जुनं रक्त संपत होत राहतं त्यामुळे ताजेपणा टिकून राहतो. रक्त संपण्याचे दोन मार्ग आहेत. जुनं रक्त मुख्यतः लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतं. दुसरं म्हणजे, जुनं रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागात जातं आणि त्याठिकाणी नवीन रक्त तयार होतं. हा रक्तप्रवाह मुख्यतः शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीद्वारे होतो. ज्यामध्ये हृदय, धमन्या आणि शिरा यांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे शरीरातील जुनं रक्त नष्ट होऊन नवीन रक्त तयार होत राहते. या प्रक्रियेमुळे ताजेपणाही कायम राहतो.
advertisement
एखाद्याच्या शरीरातून अर्धा लिटर रक्त बाहेर काढलं तर ते बनवायला जास्त वेळ लागत नाही. तो 3 ते 4 दिवसात बरा होतो. मात्र, हे त्या व्यक्तीच्या आहारावर आणि शरीरावर अवलंबून असतं. त्यामुळे रक्तदान केल्यामुळे आपलं रक्त कमी होत नाही. थोडावेळ विकनेस वाटू शकतो मात्र आपल्या शरीरात लवकर रक्त तयार होत असतं.
advertisement
आपल्या शरीरातील 60% रक्त प्लाझ्मा असते, जो पिवळ्या रंगाचा द्रव असतो. उर्वरित भागात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स असतात. लाल रक्तपेशींची संख्या (RBC) अंदाजे 50 लाख आहे. हे हिमोग्लोबिनद्वारे शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवते. जर हे नसतील तर अवयव काम करणं थांबवतात. पांढऱ्या रक्त पेशी फक्त 4 दिवस जगतात आणि नंतर नष्ट होतात. यानंतर नवीन बनवल्या जातात. या पेशी व्हायरसशी लढण्यास मदत करतात. प्लेटलेट्सची त्यांची संख्या अंदाजे 2 लाख आहे. ते 7 दिवस जिवंत राहतात. जखमी झाल्यावर ते रक्ताची गुठळी तयार करतात. प्लेटलेट्स कमी झाल्यास शरीर कमकुवत होऊ लागतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Human Body : शरीरात रोज नवीन रक्त तयार होतं, मग जुनं रक्त कुठे जातं?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement