रिलेशनशिपमधील 'Soft Launch' आणि 'Hard Launch' म्हणजे काय? Gen Z च्या प्रेमाची पद्धत माहितीय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हालाही कधी कोणी विचारलं असेल – “तू सॉफ्ट लॉन्च केलंय का?” किंवा “याला तर हार्ड लॉन्च म्हणतात” आणि तुम्ही गोंधळून गेला असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
मुंबई : आजच्या डिजिटल जगात, विशेषतः Gen Z म्हणजेच नव्या पिढीच्या जगात, रोज नवनवीन ट्रेंड्स, शब्द आणि संकल्पना समोर येत असतात. त्यातच सध्या दोन शब्द विशेष चर्चेत आहेत एक ‘सॉफ्ट लॉन्च’ आणि दुसरं ‘हार्ड लॉन्च’. सोशल मीडियावर हे शब्द सतत ऐकू येतात, पण अनेकांना अजूनही याचा अर्थ पूर्णपणे समजलेला नसतो.
जर तुम्हालाही कधी कोणी विचारलं असेल. “तू सॉफ्ट लॉन्च केलंय का?” किंवा “याला तर हार्ड लॉन्च म्हणतात” आणि तुम्ही गोंधळून गेला असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
काय असतो रिलेशनशिपमधला ‘सॉफ्ट लॉन्च’?
‘सॉफ्ट लॉन्च’ ही एक नातं जाहीर करण्याची हळुवार पद्धत असते.
यामध्ये तुम्ही सोशल मीडियावर हे दाखवता की तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, पण… पार्टनर कोण आहे, हे स्पष्टपणे दाखवत नाही.
advertisement
उदाहरण द्यायचं झालं तर, एखादी छानसी कॅफेमधली फोटो शेअर केली जाते. ज्यात समोर ठेवलेले दोन कप कॉफी, समोर बसलेल्याचा हात किंवा एक ओझरता शॉट असतो.
चेहरा मात्र दिसत नाही. ना नाव, ना टॅग. फक्त इतकंच कळतं की काहीतरी खास सुरू आहे.
ही एक गुप्त पण गोड सुरुवात असते. नातं जपताना, जगाला थोडंसं दाखवत, पण पूर्ण उघड न करता.
advertisement
काय असतो रिलेशनशिपमधला ‘हार्ड लॉन्च’?
‘हार्ड लॉन्च’ म्हणजे अगदी थेट आणि खुलेपणाने नात्याची घोषणा करणं. यामध्ये तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर करता. चेहरा स्पष्ट दिसतो, नाव टॅग करता आणि कॅप्शनमध्ये तुमच्या नात्याबद्दल लिहिता देखील.
हा प्रकार त्या लोकांसाठी असतो जे नात्याबद्दल ठाम असतात आणि ते नातं सर्वांसमोर उघड करायला तयार असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, हा “Yes, we are together!” चा क्षण असतो.
advertisement
मग दोन्हीमध्ये काय फरक?
सॉफ्ट लॉन्च- नातं आहे हे दाखवतं, पण पार्टनर कोण आहे हे उघड करत नाही.
हार्ड लॉन्च- नातं आणि पार्टनर दोन्ही थेट आणि खुलेपणाने समोर आणतं.
का निवडतात लोक ही पद्धत?
आजच्या पिढीला प्रायव्हसी आणि स्वतंत्रता दोन्ही महत्त्वाची वाटते.
कधी कधी नात्याची सुरुवात असते, त्यामुळे लोक लगेच सर्व काही शेअर न करता, हळूहळू जगासमोर आणणं पसंत करतात. तर काही लोक पूर्ण आत्मविश्वासाने त्यांच्या प्रेमाची घोषणा करतात आणि तेच हार्ड लॉन्च होतं.
advertisement
शेवटी काय?
प्रेमाची अभिव्यक्ती वेगवेगळी असू शकते. कोणाला हळुवार सुरुवात हवी असते, कोणाला स्पष्ट कबुली. ‘सॉफ्ट लॉन्च’ आणि ‘हार्ड लॉन्च’ हे त्या अभिव्यक्तीचे फक्त दोन स्टाइलिश पर्याय आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 9:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रिलेशनशिपमधील 'Soft Launch' आणि 'Hard Launch' म्हणजे काय? Gen Z च्या प्रेमाची पद्धत माहितीय?









