advertisement

Tuberculosis : कमकुवत प्रतिकारशक्ती, चुकीच्या जीवनशैलीचे घातक परिणाम, क्षयरोगाला आयतं निमंत्रण

Last Updated:

सर्दी, खोकला जास्त काळ टिकणं आणि यासोबत अचानक वजन कमी होत असेल किंवा भूक लागत नसेल तर वेळ न घालवता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण ही सर्व क्षयरोगाची लक्षणं असू शकतात. क्षयरोगाबद्दल जागरुकतेचा अभाव हे देखील मुख्य कारण आहे.

News18
News18
मुंबई : ऋतू बदलताना होणारी सर्दी किंवा काही कारणांमुळे होणारी सर्दी काही दिवस औषधं घेतल्यानंतर बरी होते. पण सर्दी असो, खोकला असो किंवा ताप असो, बराच काळ टिकणं, त्याकडे दुर्लक्ष करणं तब्येतीला घातक ठरु शकतं.
सर्दी, खोकला जास्त काळ टिकणं आणि यासोबत अचानक वजन कमी होत असेल किंवा भूक लागत नसेल तर वेळ न घालवता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण ही सर्व क्षयरोगाची लक्षणं असू शकतात. क्षयरोगाबद्दल जागरुकतेचा अभाव हे देखील मुख्य कारण आहे.
खरं तर, 2030 पर्यंत जागतिक स्तरावर आणि 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं, पण गेल्या काही काळापासून अनेक ठिकाणी क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. जगभरातील मृत्यूच्या दहा कारणांमधे हे प्रमुख कारण आहे.
advertisement
टीबीचे धोके -
क्षयरोगाचा संसर्ग मोठ्या लोकसंख्येमधे होऊ शकतो, पण त्यामुळे आजार होतोच असं नाही. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर शरीर संसर्गाला प्रतिसाद देतं आणि आजार रोखतं. म्हणून, क्षयरोग हा कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे होतो. पौष्टिक घटकांचा अभाव हे यामागचं कारण आहे.
advertisement
मधुमेह आणि एचआयव्ही असलेल्यांना क्षयरोगाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. प्रौढांमधे दोन प्रकारचे क्षयरोग असतात. फुफ्फुसीय आणि फुफ्फुसाबाहेरील क्षयरोग - फुफ्फुसीय क्षयरोगात फुफ्फुसांचा समावेश होतो. खोकला आणि ताप ही लक्षणं दिसून येतात. संसर्ग जसजसा वाढत जातो तसतसं वजन कमी होऊ शकतं. फुफ्फुसाबाहेरील क्षयरोगात, फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांमध्ये टीबी होऊ शकतो, जसं की हाडं, पोट, लिम्फ नोड्स, मेंदू इत्यादी अवयवांमधे टीबी पसरु शकतो.
advertisement
योग्य पोषण - भारतात क्षयरोगाचं एक प्रमुख कारण म्हणजे योग्य पोषण नसणं. खराब आहार आणि जीवनशैलीमुळे मधुमेह होऊ शकतो. यामुळे पौष्टिक घटक नसल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे क्षयरोगाचा संसर्ग पसरतो आणि योग्य काळजी घेतली नाही तर तो प्राणघातक देखील ठरू शकतो. हे लक्षात घेतलं पाहिजे की निरोगी आहारामुळे क्षयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त, अल्कोहोल आणि तंबाखूपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
advertisement
दोन तासांत अहवाल - मुलांमधे उपचार कमी आहेत. चाचण्यांमधील निष्काळजीपणा आणि टीबीबद्दल सामाजिक गैरसमज हे उपचारांमधील मोठे अडथळे आहेत. निदान होणं आता सोपं आहे. टीबीचा अहवाल दोन तासांत उपलब्ध होतो आणि उपचार सुरू होऊ शकतात.
कोर्स पूर्ण करण्याचं महत्त्व - क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेकदा अँटीबायोटिक्स लिहून दिली जातात. औषधांना बराच वेळ लागतो म्हणून बरेच रुग्ण कोर्स पूर्ण करत नाहीत. काही जण आर्थिक कारणांमुळे किंवा परिणामांच्या अज्ञानामुळे औषधं घेणं बंद करतात. यामुळे उपचार अधिक कठीण होऊ शकतात. औषधांचा कोर्स पूर्ण न केल्यामुळे उपचार अधिक कठीण आणि महाग होऊ शकतात.
advertisement
क्षयरोगाची मुख्य लक्षणं -
दोन-तीन आठवडे सततचा खोकला.
कधीकधी कफात रक्त येणं.
रात्री वाढणारा ताप.
रात्री घाम येणं.
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं.
श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं इ.
प्रतिबंधात्मक उपाय -
संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळा.
advertisement
बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी खोकला किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरा.
गर्दीत मास्क घाला.
मुलांना बीसीजी लसीकरण वेळेवर करा.
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या.
लक्षणं दिसली तर उपचारांना उशीर करू नका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tuberculosis : कमकुवत प्रतिकारशक्ती, चुकीच्या जीवनशैलीचे घातक परिणाम, क्षयरोगाला आयतं निमंत्रण
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement