फक्त पिंपल नाही, चेहऱ्यावर दिसले 'हे' बदल की लगेच जावं डॉक्टरांकडे, असू शकतो गंभीर आजार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
पोट साफ नसेल, अन्नपचन व्यवस्थित होत नसेल, तर त्याचा परिणाम लगेच चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर अचानक पिंपल यायला सुरूवात झाली किंवा त्वचा कोरडी पडू लागली की समजून जायचं, अन्नपचन व्यवस्थित होत नाहीये.
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झांसी : चेहऱ्यावर एकही पिंपल नसावा, डाग नसावा, त्वचा कोरडी पडलेली नसावी, चेहरा छान तजेलदार, टवटवीत दिसावा यासाठी प्रत्येक व्यक्तीचे प्रयत्न सुरू असतात. मग त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या महागड्या क्रीम्स वापरतात. परंतु तुम्हाला माहितीये का? महागड्या क्रीम्सचा आपल्या चेहऱ्यावर जेवढा फरक दिसून येत नाही, तेवढा निरोगी शरिराचा दिसून येतो. म्हणजेच आपल्या शरिरातले अवयव, रसायनं सुरळीत असतील, तरच चेहऱ्यावर तेज येतं.
advertisement
विशेषतः पोट साफ नसेल, अन्नपचन व्यवस्थित होत नसेल, तर त्याचा परिणाम लगेच चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर अचानक पिंपल यायला सुरूवात झाली किंवा त्वचा कोरडी पडू लागली की समजून जायचं, अन्नपचन व्यवस्थित होत नाहीये. अशावेळी तातडीने डॉक्टरांकडे जावं.
advertisement
स्किन एक्स्पर्ट डॉ. दीपशिखा सिंह सांगतात की, पोटच नाही, तर यकृत किंवा इतर कोणत्याही अवयवाचं कार्य सुरळीत नसेल, तरी त्याचाही परिणाम लगेच त्वचेवर दिसतो. सर्वात आधी पिंपल येतात, मग त्वचा लाल पडू लागते आणि मग कोरडी होते. शरिरातला आजार गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपचार घेणं कधीही चांगलं. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं दिसली तर त्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
advertisement
...असं झाल्यास लगेच जावं डॉक्टरांकडे
डॉ. दीपशिखा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर पिंपल दिसू लागले की तातडीने डॉक्टरांकडे जावं. सर्वात आधी जास्त पाणी प्यायला सुरूवात करावी. त्यानंतरही जर पिंपल कमी झाले नाहीत तर पाठीची आणि यकृताची तपासणी करून घ्यावी. पिंपलसोबतच त्वचेचा रंग लाल होऊ लागला तरीही डॉक्टरांकडे जावं.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Jhansi,Uttar Pradesh
First Published :
February 05, 2024 9:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त पिंपल नाही, चेहऱ्यावर दिसले 'हे' बदल की लगेच जावं डॉक्टरांकडे, असू शकतो गंभीर आजार