Gudi Padwa: तुम्ही गुढी कशी सजवणार आहात? यंदा 'मस्तानी गुढी वस्त्रांचा' ट्रेंड!

Last Updated:

'कला बाय नंदा' या ब्रँडकडून गुढी वस्त्रांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. खण, रेशमी, सेमी सिल्क असे विविध पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

+
अनेकदा

अनेकदा गुढीपाडव्याला नव्याकोऱ्या साडीची घडी मोडली जाते.

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. अनेकजण या दिवशी आपल्या आयुष्याची सुरुवात नव्या संकल्पाने करतात. घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं. अनेकजण घरी गुढी तयार करतात, तर अनेकजण बाजारातून रेडिमेड गुढी आणून तिला सुंदररित्या सजवतात. त्यामुळे गुढीपाडवा जवळ आला की, बाजारात अत्यंत देखण्या अशा वेगवेगळ्या डिझायनर वस्त्रांच्या गुढी पाहायला मिळतात.
advertisement
गुढीपाडव्याच्या खरेदीची सुरुवातच होते ती आकर्षक अशा गुढी वस्त्रापासून. गुढीला नवं न धुतलेलं वस्त्र नेसवण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेकदा गुढीपाडव्याला नव्याकोऱ्या साडीची घडी मोडली जाते. परंतु अलीकडे बहुतेकजण रेडिमेड गुढी वस्त्र खरेदी करतात.
'कला बाय नंदा' या ब्रँडकडून गुढी वस्त्रांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. खण, रेशमी, सेमी सिल्क असे विविध पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसंच पुरुषांसाठी खणाचे पारंपरिक वस्त्र आणि गुढीच्या सजावटीसाठी विविध वस्तू याठिकाणी मिळतात.
advertisement
या वस्त्रांची किंमत सुरु होते 650 रुपयांपासून. यामध्ये खण कापडात पेशवाई आणि मस्तानी वस्त्र असे विविध प्रकारही उपलब्ध आहेत. गुढीसाठी मस्तानी वस्त्राला विशेष मागणी आहे. कारण त्यावर मनमोहक असं नक्षीकाम केलेलं असतं. तसंच पैठणीचे पारंपरिक चटई काठ, काठावर मोर, फुलांची नक्षी, ब्रोकेड कापड अशा विविध प्रकारात मिळणाऱ्या वस्त्रांची किंमत आहे 1300 रुपयांपर्यंत. गुढीला पारंपरिक पद्धतीने सजविण्याकडे नागरिकांचा कल असल्यामुळे या वस्त्रांना विशेष मागणी मिळतेय. कला बाय नंदाच्या संस्थापिका नंदा मगदूम यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gudi Padwa: तुम्ही गुढी कशी सजवणार आहात? यंदा 'मस्तानी गुढी वस्त्रांचा' ट्रेंड!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement