advertisement

टॉक्सिक रिलेशनशीप म्हणजे नेमकं काय, तुम्ही अनुभवल्यात का 6 गोष्टी?

Last Updated:

‘टॉक्सिक रिलेशनशीप’ म्हणजे नेमकं काय, तुमचं नातं त्या दिशेनं खरंच जातंय का? तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील.

नेमकी काय आहेत लक्षणं?
नेमकी काय आहेत लक्षणं?
मुंबई : लग्न किंवा रिलेशनशीप ही अजिबात सोपी गोष्ट नाही. ते यशस्वी होण्यासाठी जोडप्यांना फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या तडजोडी, समजूदारपणा, संवाद, एकमेकांबद्दल ओढ आणि प्रेम असणं गरजेचं असतं. शिवाय, रिलेशनशीप असं असलं पाहिजे ज्यामुळे व्यक्तीची वैयक्तिक वाढ होईल आणि तिला भावनिक मदत मिळेल. पण, सध्याच्या काळात पती-पत्नी असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड अनेकदा त्यांच्या नात्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितीत व्यक्तीचं भावनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य बिघडू लागतं. अशा नात्याला ‘टॉक्सिक रिलेशनशीप’ म्हणजे ‘विषारी नातेसंबंध म्हणतात. तुमचं रिलेशनशीप अशा स्टेजवर पोहचलं आहे की नाही, हे ओळखण्यासाठी काही मुद्दे उपयुक्त ठरू शकतात.
भावना समजून न घेणं: स्त्री असो किंवा पुरुष त्यांना अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना काही गोष्टी जोडीदाराला सांगता येत नाहीत. पण, जर अशा गोष्टी जोडीदाराला सांगितल्या आणि तिने किंवा त्याने गांभीर्यानं घेतलं नाही तर हे टॉक्सिक नातेसंबंधाचं लक्षण असू शकतं.
निगेटिव्हिटी: अनेक वेळा नात्यात असलेल्या दोन्ही व्यक्ती एकमेकांना समजून घेण्यास असमर्थ असतात. अशा परिस्थितीत लहान गोष्टींना कधी वादाचं स्वरूप कधी येईल, हे कळत नाही. यानंतर मनात सतत निगेटिव्हिटी येते आणि मन अस्वस्थ होते. अशी स्थिती तुम्ही टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये असल्याचं लक्षण असू शकते.
advertisement
नियंत्रण ठेवणे: ही बाब पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही लागू होते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला किंवा तिला तुमच्या मतानुसार वागण्यास भाग पाडलं तर रिलेशनशीपचा शेवट होऊ शकतो. दीर्घकाळासाठी एखाद्याला नियंत्रित करणे, ही चुकीची बाब आहे.
मत्सर वाटणे किंवा मनात असूया निर्माण होणे: रिलेशनशीपमध्ये असताना थोडं पझेसिव्ह होणं, ही चांगली बाब आहे. पण, अतिपझेसिव्ह होणं चुकीचं आहे. जर तुमच्या जोडीदाराला इतरांसोबत पाहून तुम्हाला मत्सर वाटत असेल किंवा तुमच्या मनात असूया निर्माण होत असेल तर भविष्यात तुमचं रिलेशनशिप टॉक्सिक होऊ शकतं. त्यामुळे ओव्हर पझेसिव्ह होणं टाळलं पाहिजे.
advertisement
टीका करणे: हेल्दी रिलेशनशीप आणखी दृढ करण्यासाठी जोडीदारावर थोडी क्रिएटिव्ह टीका करण्यास हरकत नाही. पण, सतत टीका केल्याने रिलेशनशीप टॉक्सिक होऊ शकतं.
एकाच गोष्टीवर अडून राहणे: जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावरून भांडण झालं तर अनेकजण बोलणं पूर्णपणे बंद करतात. अशाने गैरसमज आणि दुरावा वाढतो. समजा दोघांपैकी एकाने बोलण्याचा प्रयत्न केला तर दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीवर अडून बसते. यामुळे आणखी वाद होतात. अशी परिस्थिती सतत उद्भवत असेल तर रिलेशनशीपमध्ये अर्थ राहत नाही. त्यामुळे दोघांनी नात्यात नेहमी सुसंवाद ठेवला पाहिजे.
advertisement
(ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही उपाययोजना करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
टॉक्सिक रिलेशनशीप म्हणजे नेमकं काय, तुम्ही अनुभवल्यात का 6 गोष्टी?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement