प्रवाशांना मिळणार कन्फर्म तिकीट, दिवाळीत 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय, असं आहे नियोजन

Last Updated:

indian railway - दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर विभागातून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीत मोठ्या प्रमाणात लोक आपल्या गावी, तसेच काही जण पर्यटनाला तर काही जण हे देवदर्शनाला जातात. त्यामुळे प्रवाशांची ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर विभागातून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या एकूण सेवांपैकी 42 सेवा शनिवारपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. या सर्व विशेष सेवा 85 एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार असून, त्यात वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र डबे असलेल्या व अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या 570 फेस्टिव्हल स्पेशल सेवांपैकी 108 सेवा राज्यातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी चालविल्या जाणार आहेत. तर 387 सेवा या उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी अशा विविध भागांतील प्रवाशांसाठी असतील.
advertisement
कुठून सुटणार एक्स्प्रेस -
उत्तरेकडे जाणाऱ्या एकूण सेवांपैकी 132 सेवा मुंबईतून, 146 सेवा पुण्यातून, तर उर्वरित 100 सेवा इतर ठिकाणांहून चालविल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे भारताच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष सेवा सोडणार आहे. त्यात करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरूसारख्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी 84 सेवा चालविण्यात येणार आहेत.
advertisement
यामुळे बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 537 गाड्या सुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होऊन त्यांना बसण्यासाठी जागा मिळेल. यामुळे त्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंदी असा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
प्रवाशांना मिळणार कन्फर्म तिकीट, दिवाळीत 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय, असं आहे नियोजन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement