मुस्लीम महिलांमध्ये झपाट्यानं लोकप्रिय होणारं हलाल हॉलिडे काय आहे?

Last Updated:

हलाल हॉलिडे ही संकल्पना मुस्लीम महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे.

+
News18

News18

मुंबई, 4 सप्टेंबर : पर्यटन व्यवसायामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठी वाढ झालीय. वर्षातील काही दिवस पर्यटनासाठी राखून ठेवण्याची पद्धत आता रुढ होऊ लागलीय. साहजिकच टुरिझम इंडस्ट्रीकडूनही पर्यटकांच्या आवडीचा आणि सोयीचा विचार होतोय. मुस्लीम समाज विशेषत: महिलांच्या सोयींसाठी हलाल टुरिझम हा नवा ट्रेंड आता सुरू झालाय. काय आहे हलाल टुरिझम? सामान्य पर्यटनापेक्षा यात काय वेगळेपण आहे? याबाबत मुंबईतल्या अलवी टूर ट्रॅव्हलचे डायरेक्ट इमरान अलवी यांनी माहिती दिलीय.
हलाल हॉलिडे म्हणजे काय?
इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्या मंडळींसाठी 'हलाल' हा महत्त्वाचा शब्द आहे. धार्मिक परंपरांशी तडजोड न करता सुट्टी साजरी करणे म्हणजे हलाल टुरिझम.  हॉटेल, रिसॉर्ट, मुख्यतः अशा ठिकाणी जिथे स्विमिंग पूल अथवा अन्य मनोरंजनाची ठिकाण आहेत त्या ठिकाणी मुस्लिम महिलांच्यी सोयीचा विचार केला जातो. लक्षात ठेवता. त्या महिलांच्या पेहरावला लक्षात ठेवता त्यांच्यासाठी एका विशिष्ट प्रकारे व्यवस्था असते. त्या ठिकाणी फक्त महिलांनाच प्रवेश मिळतो. कोणत्याही पुरुषांना परवानगी नसते.
advertisement
इस्लाम धर्मात मद्य हे हराम असून त्या ठिकाणी मुस्लिम जाणं शक्यतो टाळतात. त्यामुळे हलाल टुरिझममध्ये ज्या ठिकाणी मद्य विक्री होत नाही, त्या हॉटेलला पसंती दिली जाते, अशी माहिती अलवी यांनी दिली.
advertisement
इस्लाममध्ये नॉनव्हेज हे धार्मिक नियमानुसार हलाल केलेलं ग्रहण करावं. हलाल केलेलं अन्न मिळत नाही त्या ठिकाणी मुस्लिम शक्यतो नॉनव्हेज खाणे टाळतात. त्यामुळे जिथं हलाल फुड मिळतं अशाच ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते.
advertisement
भारतात हे टुरिझम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू नसलं तरी परदेशात याची मागणी वाढतीय. विशेषत: आखाती देश आणि युरोपात याला मोठी पसंती मिळतीय. या टुरिझमचा मुस्लीम महिलांना फायदा होत असल्यानं त्यांची मोठी पसंती मिळतीय. येत्या काळात यामध्ये आणखी उलाढाल वाढेल असं मत इमरान अलवी यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
मुस्लीम महिलांमध्ये झपाट्यानं लोकप्रिय होणारं हलाल हॉलिडे काय आहे?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement