Tourist Place Amravati: बांबूची झोपडी, पूल अन् बरंच काही, अमरावतीमधील तब्बल 49 एकरमध्ये निसर्गरम्य उद्यान, खास VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तर पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी फेमस आहेच. पण, अमरावती शहरातच आणखी एक ठिकाण आहे. जिथे जाऊन तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो.
अमरावती: पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येकाला हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात जाण्याची इच्छा होते. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तर पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी फेमस आहेच. पण, अमरावती शहरातच आणखी एक ठिकाण आहे. जिथे जाऊन तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो. अमरावती शहरातील वडाळी परिसरात बांबू गार्डन आहे. हे गार्डन बाहेरूनच अतिशय आकर्षक दिसते. त्या गार्डनमध्ये प्रवेश करताच पर्यटकांना विशेष आनंद मिळतो.
बांबू गार्डन परिसरात 3D टॉकीजची सुविधा
अमरावतीमधील वडाळी परिसरात असलेले हे बांबू गार्डन महाराष्ट्र वनविभागाकडून विकसित करण्यात आले आहे. हे गार्डन 49 एकर जागेवर पसरलेले आहे. या गार्डनमध्ये बांबूच्या 65 प्रजाती आहेत. या बागेत बांबूपासून बनवलेली झोपडी, बांबूपासून बनवलेला पूल यासारख्या अनेक बाबी आपल्याला बघायला मिळतात. गार्डनमध्ये प्रवेश करताच सर्वात आधी आपल्याला गोल्डन पाथ दिसतो. त्यावरून पुढे चालत गेलं की फुलपाखरू उद्यान आणि वाघाचा पिंजरा आहे. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर 3D टॉकीज सुद्धा आहे. बांबू गार्डन हे अतिशय रमणीय असं ठिकाण आहे.
advertisement
लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उत्तम सुविधा
बांबू गार्डन येथील एका भागात हिरवेगार गवत आहे. ज्यावर पाय ठेवून तुम्ही फिरू शकता. लहान मुलांसोबत खेळण्यासाठी देखील हे उत्तम ठिकाण आहे. बांबूपासून बनवलेली अनेक खेळणी सुद्धा आपल्याला त्याठिकाणी बघायला मिळतात. सुंदर अशी फुलांची बाग देखील त्याठिकाणी आहे. बांबू उद्यानात जिकडे तिकडे संपूर्ण परिसर हिरवागार आहे. या बागेत लहान मुलांकरिता सुद्धा अनेक खेळणी उपलब्ध आहेत. मैदानी खेळासाठी सुद्धा जागा उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी बोटिंगची सुविधा देखील आता नवीन सुरू करण्यात आली आहे.
advertisement
कॅक्टस गार्डनमध्ये 300 हून अधिक प्रजाती
बांबू गार्डन परिसरात एक वेगळे कॅक्टस गार्डन सुद्धा आहे. त्याठिकाणी वेगवेगळ्या 300 हून अधिक कॅक्टसच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. बसायला सुद्धा उत्तम व्यवस्था त्याठिकाणी आहे. त्याच परिसराच्या थोडं पुढे गेलं की एक वाहता झरा आहे. त्यावरून पूल आहे. तेथील दृश्य मनाला मोहून जाणार आहे.
advertisement
बांबू गार्डन हे सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत खुले असते. मंगळवार ते रविवार हे उद्यान दिलेल्या वेळेत सुरू असते. सोमवारी बंद ठेवण्यात येते. या उद्यानात पिकनिकसाठी जायचे असल्यास 30 रुपये प्रत्येक व्यक्ती असे चार्जेस लागतात. त्याची पावती सुद्धा आपल्याला मिळते. आतमध्ये गेल्यानंतर विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. या परिसरात कोणकोणते पक्षी आणि प्राणी वावरतात याची माहिती देखील त्याठिकाणी बोर्डवर लिहिलेली आहे. बांबू गार्डन येथे खेळण्यासोबतच अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांविषयी माहिती त्याठिकाणी मिळते. फोटोग्राफीसाठी सुद्धा याठिकाणी वेगवेगळे स्पॉट आहेत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
July 15, 2025 6:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Tourist Place Amravati: बांबूची झोपडी, पूल अन् बरंच काही, अमरावतीमधील तब्बल 49 एकरमध्ये निसर्गरम्य उद्यान, खास VIDEO