नाव Vaishnavi... वैष्णवी नावाच्या अर्थासह संपूर्ण जन्मकुंडली

Last Updated:

Vaishnavi Name Meaning : सध्या वैष्णवी हे नाव चांगलंच चर्चेत आहे. प्रत्येक नाव आणि प्रत्येक नावातील अक्षराचा विशिष्ट अर्थ असतो. वैष्वणी या नावाबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

News18
News18
नवी दिल्ली : हिंदू धर्मात नाव म्हणजे फक्त नाव नसतं. प्रत्येक नावाच एक अर्थ असतो. सध्या वैष्णवी हे नाव चर्चेत आहे. हे मुलीचं नाव आहे. या नावाचाही खास अर्थ आहे. वैष्णवी म्हणजे काय, हे नाव खास का आहे, या नावाचा अर्थ काय, या नावाची संपूर्ण कुंडली जाणून घेऊया.
वैष्णवी नावाचा अर्थ भगवान विष्णूची उपासक, दुर्गा देवी, गंगा, तुळशी, अजिंक्य, विष्णूची व्यक्तिरेखा असलेली ऊर्जा, देवी पार्वती, भगवान विष्णूची पत्नी, देवाप्रती भक्तीने प्रेरित.
प्रत्येक नावात प्रत्येक अक्षराचं विशिष्ट अर्थ असतात जे त्या नावाचं स्वरूप वर्णन करतात. वैष्णवीतील अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे.
V - मेहनती, अंतर्ज्ञानी आणि ज्ञानी,
A - इतरांची मते विचारात घेण्याइतके लवचिक,
advertisement
I - अधिक मानवतावादी,
S - महत्त्वाकांक्षी, सहनशील आणि स्वतंत्र व्यक्ती,
H - खूप व्यावहारिक आहात, जीवनातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पद्धतशीर पावलं उचलतात,
N - अपारंपरिक, सर्जनशील आणि मूळ व्यक्ती
आहात,
A - स्वतंत्र, आत्मविश्वासू, धाडसी आणि महत्त्वाकांक्षी,
V - प्रामाणिक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि लक्ष केंद्रीत करणारी,
I - खूप दयाळू आणि भावनांनी नियंत्रित.
advertisement
वैष्णवी नावाचं अंकशास्त्र 6
हा आकडा जबाबदारी दर्शवतो. अंकशास्त्र मूल्य 6 वर आधारित वैष्णवी काळजी घेणारी,दयाळू, संगोपन करणारी, संरक्षण करणारी, आदर्शवादी, रोमँटिक, उबदार, सुसंवादी आहे.
वैष्णवी नावाच्या व्यक्तींचे गुण, व्यक्तिमत्त्व
वैष्णवीचे हृदय सोन्यासारखे असतं आणि ती लोकांपर्यंत पोहोचू इच्छिते. वैष्णवी निसर्गाशी खूप जवळून जोडलेली आहे, पण त्याच वेळी तिला तिच्या सभोवतालचा परिसर आरामदायक हवा असतो. वैष्णवी बदलांना प्राधान्य देते आणि तिला नवीन कल्पनांचा शोध घेणं, नवीन लोकांना भेटणं, विदेशी ठिकाणं शोधणं आवडतं. वैष्णवी विनोदी आहे आणि तिला समान विचारसरणीच्या लोकांचा सहवास आवडतो. वैष्णवी प्रामाणिकपणा आणि न्यायाला महत्त्व देते.
advertisement
वैष्णवी विश्वासार्ह आहे आणि इतरांना सुज्ञ सल्ला देते. वैष्णवीला प्रेम, आपुलकी, काळजी आणि नम्रता खूप आवडते. वैष्णवी तिच्या कुटुंबाशी आणि प्रियजनांशी खूप चांगलं नातं ठेवते दाखवते. वैष्णवी प्रतिभावान, प्रेमळ, विश्वासार्ह आणि मोहक आहे आणि तिच्यात उच्च क्षमता आहे जी स्थिर, आनंदी आणि शांत जीवन जगण्यासाठी पुरेशी असू शकते.
advertisement
वैष्णवीसाठी लकी काय?
वैष्णवासाठी योग्य क्षेत्र -  संगीतकार, गायक, चित्रकार, ज्वेलर, ब्युटीशियन किंवा मॉडेल
वैष्णवीचा भाग्यशाली रंग - निळा आणि लाल,
वैष्णवीचा भाग्यवान क्रमांक 6, 1, 9.
वैष्णवीचा प्रणय क्रमांक - 1, 2, 3, 5, 8, 9,
वैष्णवीचा शुभ दिवस - शुक्रवार आणि बुधवार,
वैष्णवीचा अधिपती ग्रह शुक्र,
वैष्णवीचा भाग्यरत्न - निळा हिरा, हा हिरा धारण केल्याने प्रेम, संपत्ती, विलासिता, आराम आणि सौभाग्य मिळतं.
advertisement
एंजलनेम आणि मूनअॅस्ट्रो या वेबसाईटवर वैष्णवी नावाबाबत ही माहिती देण्यात आली आहे.
(सूचना : हा लेख ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही किंवा याचं समर्थन करत नाही.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नाव Vaishnavi... वैष्णवी नावाच्या अर्थासह संपूर्ण जन्मकुंडली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement