लग्नाळूंसाठी खूशखबर! यंदा या महिन्यात आहेत सर्वाधिक विवाह मुहूर्त

Last Updated:

तुळशीच्या लग्नानंतर विवाहाचे मुहूर्त सुरू होतात. यंदा कोणते शुभ मुहूर्त आहेत? इथं पाहा.

+
लग्नाळूंसाठी

लग्नाळूंसाठी खूशखबर! यंदा या महिन्यात आहेत सर्वाधिक विवाह मुहूर्त

वर्धा, 22 नोव्हेंबर: कोणतेही कार्य किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त निश्चितपणे पाहिला जातो. हिंदू धर्मात लग्नासारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त महत्त्वाचा असतो. हिंदू रितीरिवाजानुसार मंगल दिवस आणि मुहूर्तावर शुभकार्य केल्याने वैवाहिक जीवन चांगलं जातं, असं मानतात. तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. यंदा नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत लग्नकार्यासाठी अनेक शुभ तारखा दिल्या आहेत. हे शुभ मुहूर्त नेमके कोणते आहेत याबाबत वर्धा येथील ज्योतिष अभ्यासक ज्योती बांगडभट्टी यांनी माहिती दिली आहे.
नोव्हेंबर 2023 : 27, 28 आणि 29 नोव्हेंबर
डिसेंबर 2023 : 6, 7, 8, 14, 15, 17, 20, 21, 25 आणि 31 डिसेंबर
जानेवारी 2024 : जानेवारी महिन्यामध्ये येते 3 जानेवारी, 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी, 8 जानेवारी, 17 जानेवारी, 22 जानेवारी, 27 जानेवारी, 28 जानेवारी आणि 30 जानेवारी.
advertisement
फेब्रुवारी 2024 : 1 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारी.
मार्च 2024 : 3 मार्च, 4 मार्च, 6 मार्च, 11 मार्च, 16 मार्च, 17 मार्च, 26 मार्च, 27 मार्च आणि 30 मार्च.
advertisement
एप्रिल 2024 : 1 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल आणि 5 एप्रिल.
भारतीय विवाहांच्या समृद्ध जगतामध्ये विवाह मुहूर्त किंवा शुभ विवाह तारखांच्या संकल्पनेला महत्त्व आहे. येणाऱ्या नवीन वर्षात लग्न करणाऱ्या लग्नाळुंसाठी एक खूशखबर आहे. नवीन वर्षात यंदा लग्नाचे खूप शुभ मुहूर्त आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक विवाहाच्या तारखा आहेत. त्यामुळे या वर्षी विवाहाचं नियोजन असेल तर वरील विवाह मुहूर्तांचा विचार करता येईल, असे बांगडभट्टी सांगतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नाळूंसाठी खूशखबर! यंदा या महिन्यात आहेत सर्वाधिक विवाह मुहूर्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement