Kutch Rann Utsav : कच्छ रन उत्सवाला जाण्याची इच्छा आहे? इथे पाहा कालावधी, बुकिंग प्रक्रिया आणि खर्च
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How and when to go kutch rann utsav : गुजरातचा कच्छ रण उत्सव हा पर्यटकांसाठी एक अविश्वसनीय आणि अविस्मरणीय अनुभव असतो. पांढऱ्या वाळवंटाच्या विशाल भूमीवर आयोजित होणारा हा महोत्सव म्हणजे संगीत, नृत्य आणि स्थानिक परंपरांचा एक सुंदर संगमच असतो.
मुंबई : भारतामधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी गुजरातचा रण ऑफ कच्छ आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी अग्रगण्य आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. गुजरातचा कच्छ रण उत्सव हा पर्यटकांसाठी एक अविश्वसनीय आणि अविस्मरणीय अनुभव असतो. पांढऱ्या वाळवंटाच्या विशाल भूमीवर आयोजित होणारा हा महोत्सव म्हणजे संगीत, नृत्य आणि स्थानिक परंपरांचा एक सुंदर संगमच असतो. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती.
कच्छ रण उत्सवाची सुरुवात 23 ऑक्टोबर 2025 पासून झाली आहे आणि ते 4 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. तब्बल पाच महिने चालणारा हा उत्सव एखाद्या मोठ्या जत्रेसारखा असतो, जिथे पांढऱ्या वाळवंटाच्या धरतीवर गुजरातची समृद्ध संस्कृती पर्यटकांना जवळून अनुभवता येते. इथे तुम्हाला कसे जात येईल आणि काय काय करता येईल याबद्दल माहिती घेऊया.
advertisement
हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 'रण ऑफ कच्छ' च्या विशाल पांढऱ्या वाळवंटावर खास टेंट सिटी उभारण्यात आली आहे. देश-विदेशातून आलेले पर्यटक येथे रात्रीचा मुक्काम करतात. या टेंट सिटीमध्ये रात्र घालवण्याचा अनुभव खूपच वेगळा आणि रोमांचक असतो. रात्रीच्या वेळी वाळवंटातील शांतता आणि दिव्यांची रोषणाई एक जादुई वातावरण निर्माण करते.
टेंटचे विविध प्रकार आणि सुविधा..
advertisement
नॉन-एसी स्विस कॉटेज : यात तुम्हाला मूलभूत सुविधा मिळतात. यात एसी नसतो, पण ट्विन/डबल बेड आणि अटॅच्ड बाथरूमची सुविधा दिलेली असते.
डिलक्स एसी स्विस कॉटेज : या कॉटेजमध्ये तुम्हाला नॉन-एसी कॉटेजपेक्षा थोडी जास्त सुविधा मिळते. येथे एसीची सुविधा उपलब्ध असते. यातही ट्विन बेड किंवा डबल बेड आणि अटॅच्ड बाथरूम यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
advertisement
प्रीमियम टेंट : या प्रकारच्या टेंटमध्ये उत्कृष्ट इंटिरियर, एसी आणि बसायची जागा मिळते. या टेंटचा आकार अंदाजे 473 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला असतो.
सुइट श्रेणीतील टेंट : त्याचप्रमाणे आणखी एक खास आणि मोठे टेंट असते. ते म्हणजे सुइट श्रेणीतील टेंट. या टेंटमध्ये सुइट श्रेणीतील सुविधांची सुरुवात होते.
राजवाडी सुइट : या कॅम्पमध्ये तुम्हाला राजेशाही वातावरण, लाँग लिव्हिंग एरिया आणि प्रायव्हेट डायनिंगची सुविधाही मिळते. हा टेंट सुमारे 900 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला असतो.
advertisement
दरबारी सुइट : हा सर्वात आलिशान पर्याय आहे. यात दोन बेडरूम, भरपूर जागा आणि प्रायव्हेट डायनिंग यांसारख्या सुविधा मिळतात. हा टेंट सुमारे 1,600 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला असून, गुजरातमध्ये राहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
कच्छ रण उत्सव तिकीट बुकिंग कसे करावे?
- रण उत्सवाच्या टेंट सिटीसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग करणे खूप सोपे आहे. रण उत्सवाच्या अधिकृत वेबसाइटवर जा किंवा तुम्ही गुजरात पर्यटनच्या अधिकृत वेबसाइटवरूनही तिकीट बुक करू शकता. येथे तुम्हाला विविध श्रेणीतील कॅम्प पॅकेज उपलब्ध होतील.
advertisement
- बुकिंग करताना तुम्हाला नॉन-एसी आणि एसी दोन्ही कॅम्पचे पर्याय मिळतील. तुमचे बजेट आणि वेळ लक्षात घेऊन, येथे तुम्ही तुमच्या सोयीची तारीख आणि पॅकेज निवडून बुकिंग पूर्ण करू शकता. या उत्सवाला भेट देणे हा निश्चितच एक आठवणीत राहणारा अनुभव असेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kutch Rann Utsav : कच्छ रन उत्सवाला जाण्याची इच्छा आहे? इथे पाहा कालावधी, बुकिंग प्रक्रिया आणि खर्च


