Pune Metro: ट्रॅफिक जामला टाटा! पुण्यात आणखी 2 मेट्रो धावणार, कसे असतील नवे मार्ग?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून वाहतूक कोंडीच्या त्रासातून लवकरच सुटका होणार आहे. पुण्यातील उपनगरांपर्यंत आता मेट्रो धावणार आहे.
पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने पुण्यातील आणखी दोन मेट्रो मार्गांना मान्यता दिली आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून उपनगरांपर्यंत मेट्रो सेवा पोहोचणार आहे. आता नवीन प्रस्तावित मार्गांमध्ये लोणी काळभोर – सासवड रोड रेल्वे स्थानक आणि हडपसर – खडकी – बावधन या दोन लाईन्सचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत आतापर्यंत पिंपरी चिंचवड – स्वारगेट आणि वनाज – रामवाडी हे दोन मार्ग कार्यान्वित झाले आहेत. तर आता दोन मार्ग प्रस्तावित असून या दोन्ही मार्गांमुळे पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
हडपसर परिसरातील रहिवाशांसाठी खडकीमार्गे बावधनपर्यंतचा प्रवास जलद, सुरक्षित आणि स्वस्त होईल. तर लोणी काळभोर व सासवड रोड परिसरातील नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा अत्यंत सोयीस्कर दुवा उपलब्ध होईल.
असा आहे मार्ग..
पीएमआरडीए कडून मेट्रो 3 अंतर्गत हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग साकारण्यात येतोय. हा मार्ग पुढे हडपसर पर्यंत असणार आहे. आता मेट्रो 2 मध्ये खडकवासला -स्वारगेट -हडपसर -खराडी हा मेट्रो मार्ग देखील असणार आहे. दोन्ही मार्गावरून प्रवाशांना पुढे या दोन उपमार्गांवर जाता येणार आहे.
advertisement
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड दोन्ही मार्गांचे एकूण 16 किलोमीटर अंतर आहे. यात एकूण 14 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही उपमार्गांसाठी 5704 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या दोन्ही मार्गांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 05, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: ट्रॅफिक जामला टाटा! पुण्यात आणखी 2 मेट्रो धावणार, कसे असतील नवे मार्ग?


