Popcorn Brain Syndrome : सोशल मीडियावर रिल्स पाहताय सावधान! मेंदूचा होतोय 'पॉपकॉर्न'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Popcorn Brain Syndrome : मोबाईल वापरणं आरोग्यासाठी हानिकारक... मोबाईलचे बरेच गंभीर दुष्परिणाम आहेत, पण तुम्ही कधी पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोमबाबत आलं आहे का?
मोबाईल 24 तास आपला सोबती... ज्याचा वापर आपण फक्त फोन करण्यासाठी किंवा मेसेजसाठी करत नाही तर आपल्या मनोरंजनासाठीही करतो. दिवसभर मोबाईलवर सोशल मीडियावर कितीतरी रिल्स आपण पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का? हे रिल्स पाहणं तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. तुमचा मेंदू पॉपकॉर्न बनत चालला आहे.
मोबाईल वापरणं आरोग्यासाठी हानिकारक... मोबाईलचे बरेच गंभीर दुष्परिणाम आहेत, पण तुम्ही कधी पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोमबाबत आलं आहे का? मीडिया रिपोर्टनुसार, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलजेच्या मनोरुग्ण विभागाचे हेड डॉ. कुमार गौरव यांनी सांगितलं की, ओपीडीमध्ये आता पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोमचे रुग्ण सापडत आहेत. जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत 113 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचं वय 25 ते 45 वर्षे आहे.
advertisement
काय आहे पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम
गेल्या काही वर्षांत मानसिक आरोग्याच्या जगात ही एक नवीन संज्ञा सामान्य झाली आहे. ही अशी मानसिक अवस्था आहे, ज्यात मनात एकामागून एक वेगाने विचार येतात, जसे गरम भांड्यात मका किंवा कॉर्नचे दाणे उडतात. अगदी असाचा पॉपकॉर्नसारखे मेंदूतही बरेच विचार येतात. आपला मेंदू एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणं कठीण होतं. मनाची ही स्थिती आपल्या उत्पादकता आणि सर्जनशीलतेवर गंभीर परिणाम करते.
advertisement
मोबाईलमुळे पॉपकॉर्न ब्रेन कसा होतोय?
सोशल मीडियाच्या रील्स आणि शॉर्ट्समुळे पॉपकॉर्न ब्रेनची समस्या वाढली आहे. दर 30 सेकंदांनी बदलणाऱ्या या रील्स आपल्याला सतत काहीतरी नवीन पाहण्यास भाग पाडतात. यामुळे आपला मेंदू एकाच ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. दर 30 सेकंदांनी आपल्याला एक नवीन रील दिसते. यामुळे आपल्या मेंदूला सतत उत्तेजना आणि उत्साह मिळतो. यामुळे डोपामाइन बाहेर पडतो, जो आपल्या आत उत्साह निर्माण करणारा हार्मोन आहे.
advertisement
तुम्हाला वाटेल की डोपामाइन बाहेर पडत आहे आणि आपण आनंदी आहोत हे चांगलं आहे. पण हा सततचा आनंद तुमच्या मेंदूला सतत सक्रिय ठेवतो. त्याचा नकारात्मक परिणाम म्हणजे नैराश्य आणि चिंता वाढते. संशोधनातून असं दिसून आलं आहे की जर तुम्ही 6 तासांपेक्षा जास्त काळ सोशल मीडियाचा वापर केला तर तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता 11 टक्क्यांनी वाढते. त्याच वेळी, चिंता आणि निद्रानाश होण्याची शक्यता सहा पटीने वाढते.
advertisement
सोशल मीडिया आणि डिजिटायझेशनमुळे हा आजार वाढत आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. सिकाफा जाफरीन यांनी लोकल18शी बोलताना सांगितलं की, हा एक सिंड्रोम आहे ज्यामध्ये मन सर्वकाही पाहण्याचा प्रयत्न करत प्रचंड धावते. या सिंड्रोममुळे उत्सुकतेची भावना वाढते आणि मन ही उत्सुकता पूर्ण करण्यासाठी सर्व दिशेने धावते.
advertisement
डॉ. सिकाफा यांनी स्पष्ट केले की पॉपकॉर्न ब्रेन मानसिक क्षमतेवर परिणाम करतो. पॉपकॉर्न ब्रेन मेंदूमध्ये अस्थिरता निर्माण करत आहे, ज्यामुळे आवश्यक लक्ष केंद्रीत होत नाही आणि नैराश्य येते. शिकण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या आणि भावनांवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेवर खोलवर परिणाम होतो, ज्यामुळे स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होतो. लोक एखाद्या विषयावरील सखोल माहिती आत्मसात करू शकत नाहीत.
advertisement
माहितीनुसार 2011 मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाचे संशोधक डेव्हिड लेव्ही यांनी या समस्येला पॉपकॉर्न सिंड्रोम असं नाव दिलं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 26, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Popcorn Brain Syndrome : सोशल मीडियावर रिल्स पाहताय सावधान! मेंदूचा होतोय 'पॉपकॉर्न'


