Winter Care : हिवाळ्यात चणे आणि गूळ एकत्र खाणं किती फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

Last Updated:

एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम गोंधळ निर्माण करतो. गुळ आणि चणे एकत्र खाणं खरंच आरोग्यासाठी फायद्याचं असतं का? की ही फक्त एक जुन्या काळातील सवय आहे? हिवाळ्यात हे का सुचवलं जातं? याचं वैज्ञानिक आणि आयुर्वेदीक उत्तर जाणून घेऊया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : हिवाळा सुरू झाला की आपण सगळेच आपल्या दैनंदिन आहारात थोडेसे बदल करतो. शरीराला उब राहावी, ताकद टिकावी आणि सर्दी, खोकलासारख्या आजारांपासून बचाव व्हावा, यासाठी गरम, पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थांकडे लोकांचा ओढा वाढतो. ग्रामीण भागात तर अनेक वर्षांपासून वापरला जाणारा गुळ आणि चणे हा एक हिवाळी कॉम्बिनेशन शहरांमध्येही आता खूप लोकप्रिय झाला आहे. स्वस्त, पौष्टिक, सहज उपलब्ध आणि खायला अतिशय सोपा, त्यामुळे हा पदार्थ आजही प्रत्येक घरात आवडीने खाल्ला जातो.
पण एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम गोंधळ निर्माण करतो. गुळ आणि चणे एकत्र खाणं खरंच आरोग्यासाठी फायद्याचं असतं का? की ही फक्त एक जुन्या काळातील सवय आहे? हिवाळ्यात हे का सुचवलं जातं? याचं वैज्ञानिक आणि आयुर्वेदीक उत्तर जाणून घेऊया.
गुळ आणि चण्यातील पोषक तत्वं : एक परफेक्ट कॉम्बिनेशन
गुळ आणि चणे हे दोन्ही पदार्थ स्वतंत्रपणेही पोषणाने समृद्ध आहेत. त्यामुळे दोघांचा एकत्रित परिणाम अधिक फायदेशीर ठरतो. गुळमध्ये आढळणारे पोषक घटक आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स नैसर्गिक गोडवा फायदेशिर आहे. शिवाय ते प्रोटीनचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. व्हिटॅमिन B-ग्रुप, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फाइबरची मुबलक मात्रा देखील त्यात आहे.
advertisement
एक्स्पर्ट काय सांगतात?
जयपूरच्या आयुर्वेद तज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्या मते "हिवाळ्यात गुळ-चणे खाणं हे शरीराला उष्णता देणारं, ऊर्जा पुरवणारं आणि पोषण देणारं सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे."
दररोज जर एखाद्या व्यक्तीने एक मूठ चणे आणि थोडासा गुळ खाल्ला, तर दिवसभरात शरीराची ताकद, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली राहते. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम समतोल असल्याने हे ‘हिवाळ्यातील सुपरफूड’ मानलं जातं.
advertisement
हिवाळ्यात गुळ-चणे खाल्ल्याचे प्रमुख फायदे
1. इम्युनिटी वाढवते
हिवाळ्यात सर्दी-ताप, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी जास्त दिसतात. गुळातील अँटिऑक्सिडंट्स आणि चण्यातील प्रोटीन शरीराला रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात, म्हणून आयुर्वेदात हिवाळ्यात गुळ-चणे खाण्याची खास शिफारस आहे.
2. रक्तातील आयरनची कमतरता भरून काढते
गुळ हा आयरनचा नैसर्गिक स्रोत असल्याने तो हिमोग्लोबिन वाढवण्यात मदत करतो. ज्यांना रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) आहे, त्यांना गुळ खाणं विशेष फायद्याचं मानलं जातं.
advertisement
3. हाडे आणि मसल्स मजबूत होतात
गुळातील कॅल्शियम, चण्यातील प्रोटीन, या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे हाडे मजबूत होतात, स्नायूंची ताकद वाढते आणि शरीराला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवत नाही.
4. पचनशक्ती सुधारते
चण्यातील फाइबरमुळे पचन चांगलं होतं. गुळ हा देखील पचनसंस्थेसाठी नैसर्गिक क्लेंझर मानला जातो. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या कमी होतात.
advertisement
हिवाळ्यात गुळ-चणे कसे खावेत?
सकाळी किंवा दुपारच्या मधल्या वेळेत एक मूठ भिजवलेले किंवा भाजलेले चणे त्यासोबत 1–2 छोटे तुकडे गुळाचे यावर पाणी लगेच पिऊ नये, दररोज 20–25 ग्रॅम गुळ पुरेसं.
गुळ आणि चणे हे फक्त पारंपरिक पदार्थ नसून, त्यामागे ठोस पोषण विज्ञान आणि आयुर्वेदीक कारणं आहेत. हिवाळ्यात त्याचं सेवन केल्याने ऊर्जा वाढते, इम्युनिटी मजबूत होते, पचन सुधारते, हाडे आणि स्नायू मजबूत होतात, म्हणून तुमच्या हिवाळी आहारात गुळ-चणेचा समावेश हा नक्कीच फायदेशीर आणि आरोग्यदायी ठरतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यात चणे आणि गूळ एकत्र खाणं किती फायदेशीर? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement