Interesting Facts : बाथरूम, पावडर रूम, वॉशरूम, रेस्टरूम, लॅव्हेटरी... सर्वांमध्ये नेमका फरक काय?

Last Updated:

Toilets different names : तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, शौचालयांवर वेगवेगळी नावे लिहिलेली असतात. बाथरूम, पावडर रूम, वॉशरूम, रेस्टरूम, लॅव्हेटरी.. आज आपण यांच्यातील नेमका फरक जाणून घेणार आहोत.

शौचालयाची वेगवेगळी नावे
शौचालयाची वेगवेगळी नावे
मुंबई : आजच्या काळात जेव्हा जेव्हा आपण बाहेर जातो, तेव्हा आपल्याला अनेक ठिकाणी शौचालये दिसतात. भारतामध्ये रस्त्यांवर सुलभ शौचालये बांधलेली असतात. याव्यतिरिक्त, रेस्टॉरंट्सपासून ते मॉल्सपर्यंत सर्वत्र तुम्हाला शौचालये मिळतील. पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, या शौचालयांवर वेगवेगळी नावे लिहिलेली असतात. बाथरूम, पावडर रूम, वॉशरूम, रेस्टरूम, लॅव्हेटरी.. आज आपण यांच्यातील नेमका फरक जाणून घेणार आहोत.
आपण कुठेही गेलो तरी तिथे गरजेच्या वेळेला सर्वांनाच टॉयलेट हवे असते. मात्र प्रत्येक ठिकाणी टॉयलेट असे म्हणून चालत. काही वेगवेगळे शब्द असतात. जसे की बाथरूम, पावडर रूम, वॉशरूम, रेस्टरूम, लॅव्हेटरी.. जगात एकाच खोलीला डझनभर नावांनी संबोधले जाते आणि प्रत्येक नावाचा स्वतःचा वेगळा अर्थ आहे. आज आम्ही तुम्हाला टॉयलेट्ससाठी वापरले जाणारे Bathroom, Washroom, Restroom, Lavatory, Powder Room यांसारख्या नावांचा मूळ फरक सांगत आहोत.
advertisement
Bathroom (बाथ-रूम)
मूळ अर्थ : जिथे आंघोळीची जागा आहे. अमेरिका आणि भारतामध्ये आपण घरातील टॉयलेटलाही 'बाथरूम' म्हणतो, भले तिथे बाथटब नसो. प्रत्यक्षात जर फक्त टॉयलेट असेल आणि आंघोळीची जागा नसेल, तर त्याला 'बाथरूम' म्हणणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. पण भारतात बहुतेक घरांमध्ये जिथे आंघोळ केली जाते, तिथेच टॉयलेटही बनलेले असते. त्यामुळे आपण त्यांना बाथरूम म्हणतो.
advertisement
Washroom (वॉश-रूम)
मूळ अर्थ : जिथे फक्त हात-तोंड धुण्याची जागा आहे. ऑफिस, शाळा, फॅक्टरी यांसारख्या ठिकाणी बहुतेकदा वॉशरूम लिहिलेले असते. कारण तिथे बाथटब नसतो. फक्त बेसिन आणि टॉयलेट असतात. भारतामध्ये आपण “वॉशरूम” बोलून थोडे प्रोफेशनल दिसण्याचा प्रयत्न करतो.
Restroom (रेस्ट-रूम)
मूळ अर्थ : “विश्रांतीची जागा” अमेरिकेत १९०० च्या दशकात लोक 'टॉयलेट' हा शब्द उच्चारण्यास लाजत असत. त्यामुळे दुकानदारांनी “रेस्टरूम” असे लिहून ठेवले. म्हणजे थोडी विश्रांती घ्या. आजही अमेरिकेतील मॉल्स, रेस्टॉरंट्स, थिएटरमध्ये रेस्टरूमच लिहिलेले असते.
advertisement
Lavatory (लॅव्हेटरी)
मूळ अर्थ : लॅटिन शब्द “lavare” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “धुणे” असा आहे. विमान, ट्रेनमध्ये याचा वापर होतो. विमानात जागा कमी असल्यामुळे “लॅव्हेटरी” हा लहान आणि औपचारिक शब्द वापरला जातो.
Powder Room (पावडर रूम)
मूळ अर्थ : जिथे महिला मेकअपचे “पावडर” लावतात. 18 व्या शतकात श्रीमंत घरातील स्त्रिया पार्टीच्या मध्ये मेकअप ठीक करण्यासाठी जात असत, म्हणून त्याला पावडर रूम म्हटले जाऊ लागले. आजकाल फॅन्सी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये महिलांच्या टॉयलेटला पावडर रूम लिहितात, जेणेकरून ते 'क्लासी' वाटावे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Interesting Facts : बाथरूम, पावडर रूम, वॉशरूम, रेस्टरूम, लॅव्हेटरी... सर्वांमध्ये नेमका फरक काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement