यंदा मान्सून जोरदार बरसल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, रब्बी हंगामात मान्सून च्या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने रबी पेरणी करू लागले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बी हंगामात गहू पेरणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. पाहुयात गव्हाच्या कोणत्या उन्नत जाती आहेत ज्या चांगले उत्पादन देऊ शकतात.



