Men Women Height Difference : पुरुष महिलांपेक्षा उंच का असतात, फक्त 5 इंच फरकाचं रहस्य, तज्ज्ञांनी शोधून काढलं

Last Updated:

Why Men Taller Than Women : पुरुष महिलांपेक्षा उंच का असतात हे शोधण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या टीमने एकत्रितपणे सुमारे 10 लाख लोकांच्या डीएनए डेटाचं विश्लेषण केलं. यामार्फत शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या शाळेतील मित्रमैत्रिणींच्या संपर्कात असाल तर एक गोष्ट आवर्जून पाहिली असेल. शाळेत मुलींपेक्षा उंचीचे लहान असलेली मुलं त्याच मुलींपेक्षा उंच होतात. सामान्यपणे बहुतेक पुरुषांची उंची महिलांपेक्षा जास्त असते. सामान्यपणे पुरुष आणि महिलांच्या उंचीमध्ये सरासरी 5 इंचाचा फरक असतो. यामागे कारण काय, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे.
अमेरिका आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या टीमने एकत्रितपणे सुमारे 10 लाख लोकांच्या डीएनए डेटाचं विश्लेषण केलं. यामार्फत शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. हा अभ्यास प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे. नवीन संशोधनातून असं दिसून आलं आहे की त्याचं कारण जैविक, अनुवांशिक आणि हार्मोनल घटकांमध्ये आहे.
advertisement
उंची प्रामुख्याने अनुवांशिक घटकांवर अवलंबून असते. पुरुष आणि महिलांमध्ये X आणि Y गुणसूत्रांची उपस्थिती उंचीवर परिणाम करते. पुरुषांमध्ये XY चे गुणसूत्र संयोजन असते, तर महिलांमध्ये XX असते. Y गुणसूत्रातील काही जनुके, जसे की SHOX (शॉर्ट स्टेचर होमिओबॉक्स) जनुक, हाडांची वाढ आणि लांबी नियंत्रित करतात. पुरुषांमध्ये Y गुणसूत्राची उपस्थिती आणि त्याच्याशी संबंधित जनुकांमुळे उंची वाढू शकते. जरी SHOX जनुक पुरुष आणि महिला दोघांमध्येही असले तरी त्याच्या परिणामांमध्ये फरक आहे. कारण SHOX जनुक Y गुणसूत्रावर अधिक सक्रिय असतो, जो पुरुषांची उंची वाढवतो.
advertisement
या अभ्यासात अशा लोकांचाही समावेश होता ज्यांच्या शरीरात अतिरिक्त X किंवा Y गुणसूत्र होते. या दुर्मिळ परिस्थिती आहेत. अशा प्रकरणांमध्ये, असे आढळून आले की अतिरिक्त Y गुणसूत्रामुळे लोकांची उंची अधिक वाढली, तर अतिरिक्त X गुणसूत्राचा समान परिणाम झाला नाही. यावरून हे स्पष्ट झाले की Y गुणसूत्रात असलेल्या SHOX जनुकाचा उंचीवर जास्त परिणाम होतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की SHOX जनुकाची ही विशिष्ट स्थिती महिलांमध्ये थोडी कमी सक्रिय असते, ज्यामुळे त्यांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. हे जनुक पुरुषांमध्ये अधिक काम करते आणि हेच पुरुषांमध्ये सुमारे २५% जास्त उंचीचे कारण आहे. उर्वरित फरक टेस्टोस्टेरॉन सारख्या लैंगिक संप्रेरकांमुळे आणि इतर अनुवांशिक घटकांमुळे आहे.
advertisement
या नवीन अभ्यासाव्यतिरिक्त, पुरुष आणि महिलांच्या उंचीतील फरकामागे इतर काही कारणे आहेत. हार्मोनल फरकांसारखे. उंचीतील फरकाचे एक प्रमुख कारण म्हणजे टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स. पुरुषांमध्ये यौवनकाळात टेस्टोस्टेरॉन हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देते. हे हाडांची लांबी आणि घनता वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे पुरुषांची सरासरी उंची वाढते. तर इस्ट्रोजेन महिलांमध्ये हाडांच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. याशिवाय, महिला आणि पुरुषांच्या तारुण्यकाळातील बदल, शरीराची रचना इत्यादी गोष्टी देखील उंचीतील फरकासाठी जबाबदार आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Men Women Height Difference : पुरुष महिलांपेक्षा उंच का असतात, फक्त 5 इंच फरकाचं रहस्य, तज्ज्ञांनी शोधून काढलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement