advertisement

अवघ्या 500 रुपयांत घ्या ब्रँडेड स्वेटर, पिंपरी-चिंचवडमध्ये हिवाळी ऑफर, पाहा लोकेशन, Video

Last Updated:

Winter Shopping: पुण्यासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हिवाळी कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी होत आहे.

+
अवघ्या

अवघ्या 500 रुपयांत घ्या ब्रँडेड स्वेटर, पिंपरी-चिंचवडमध्ये हिवाळी ऑफर, पाहा लोकेशन, Video

पुणे : महाराष्ट्रभर आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. पुण्याच्याही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे पुणेकर स्वेटर, मफलर, हातमोजे अशा उबदार कपड्यांची खरेदी करू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील होलसेल मार्केटमध्ये हिवाळी कपड्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी 700 ते 800 रुपयांना मिळणारी हुडी अगदी 500 रुपयांत मिळते. याच मार्केटबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी–चिखली परिसरात असलेल्या होलसेल मार्केटमध्ये हिवाळ्याच्या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. हूडी, जॅकेट, स्वेटर, मफलर, शॉल, हातमोजे असे विविध प्रकारचे कपडे येथे अनेक व्हरायटीमध्ये मिळत आहेत. स्वस्त दरात कपडे उपलब्ध असल्यामुळे पुणेकरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
advertisement
या मार्केटमध्ये तुम्हाला 20 ते 25 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. प्रत्येक कपड्यावर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याने हिवाळ्याच्या खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. साधारणपणे 900 रुपयांना मिळणारी हूडी येथे फक्त 500 रुपयांत उपलब्ध आहे. ट्रॅकसूट देखील तुम्हाला 500 रुपयांच्या दरात मिळत आहे. महिलांसाठी खास स्वेटर देखील 500 रुपयांच्या रेंजपासून मिळतात.
advertisement
आकुर्डी-चिखली परिसरातील या मार्केटमध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र सेक्शन ठेवण्यात आले आहेत. विविध रंग, साइज आणि डिझाइन्समध्ये नवीन स्टॉकही उपलब्ध झाला आहे. दररोज नवीन माल येत असल्याने ग्राहकांना भरपूर व्हरायटीज या ठिकाणी मिळत आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अवघ्या 500 रुपयांत घ्या ब्रँडेड स्वेटर, पिंपरी-चिंचवडमध्ये हिवाळी ऑफर, पाहा लोकेशन, Video
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement