Magic Box Rangoli: मॅजिक बॉक्सने सजवा दार,अवघ्या 25 सेकंदात काढा रंगीबेरंगी रंगोळी, मुंबईत इथं करा खरेदी, Video

Last Updated:

सणासुदीच्या दिवसांत सजावटीची लगबग सुरू असते. यामध्ये दारात रंगवलेली आकर्षक रांगोळी ही एक खास परंपरा मानली जाते.

+
मॅजिक

मॅजिक बॉक्सने सजवा दार,अवघ्या २५ सेकंदात रंगीबेरंगी रंगोळी!

मुंबई: सणासुदीच्या दिवसांत सजावटीची लगबग सुरू असते. यामध्ये दारात रंगवलेली आकर्षक रांगोळी ही एक खास परंपरा मानली जाते. मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वेळेअभावी अनेकांना स्वतः हाताने रांगोळी काढणं जमत नाही. याच गरजेला ओळखून बोरिवलीतील ए वन रांगोळी कलेक्शन या ब्रँडने मॅजिक बॉक्स ही एक भन्नाट कल्पना सादर केली आहे.
मॅजिक बॉक्स हे नाव असलेले हे खास रांगोळी साचे इतके सोपे आणि सुलभ आहेत की घरातील कुणीही अवघ्या 20 ते 25 सेकंदांत उठावदार रांगोळी सहज काढू शकतो. विशेष म्हणजे या साच्यांमध्ये डबल कलर रांगोळी करण्याची सोय असून एकाच साच्यात दोन रंग वापरून अधिक आकर्षक आणि लक्षवेधक रांगोळी तयार करता येते. पारंपरिक डिझाईन्सपासून ते ट्रेंडनुसार बदलणाऱ्या आधुनिक आकृतींपर्यंत 9 विविध प्रकारचे साचे या बॉक्समध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
मॅजिक बॉक्समध्ये 2 रंगांचे डब्बे आणि हे 9 साचे मिळतात आणि त्याची किंमत फक्त 350 रुपये इतकी किफायतशीर आहे. याशिवाय पट्यांच्या रांगोळ्या केवळ 100 रुपयांत उपलब्ध आहेत. ए वन रांगोळी कलेक्शन कडून होलसेल दरातही साचे मिळतात आणि संपूर्ण मुंबईमध्ये मोफत होम डिलिव्हरीची सुविधा दिली जाते.
advertisement
रोजच्या गडबडीत वेळ वाचवूनही तुमच्या दारात आकर्षक आणि उठावदार रांगोळी असावी, असं वाटत असेल तर मॅजिक बॉक्स हे खरोखरच परफेक्ट पर्याय ठरतो, असे ब्रँडचे मालक सांगत आहेत. सणाच्या आधीच यांची मागणी वाढत असल्याने स्टॉक लवकर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून तुमची ऑर्डर लवकरात लवकर नोंदवा असे आवाहन त्यांनी केले आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Magic Box Rangoli: मॅजिक बॉक्सने सजवा दार,अवघ्या 25 सेकंदात काढा रंगीबेरंगी रंगोळी, मुंबईत इथं करा खरेदी, Video
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement