Winter Clothes : मुंबईकरांनो, स्वेटर, जाॅकेट घेऊन टाका, थंडी वाढणार, किंमत फक्त 50 रुपयांपासून!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
प्रसिद्ध स्वेटर मार्केटमध्ये सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दरवर्षी हिवाळा सुरू होताच येथे विविध प्रकारचे कपडे आणि अॅक्सेसरीजचे स्टॉल्स उभे राहतात.
मुंबई : मुंबईत हिवाळ्याची चाहूल लागल्याने शहरातील नागरिकांनी थंडीच्या कपड्यांची खरेदी मोठ्या उत्साहात सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर परेलमधील प्रसिद्ध स्वेटर मार्केटमध्ये सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दरवर्षी हिवाळा सुरू होताच येथे विविध प्रकारचे कपडे आणि अॅक्सेसरीजचे स्टॉल्स उभे राहतात. परळ स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आणि प्रभादेवी परिसरालाही जवळ असल्याने या मार्केटला मोठी मागणी असते.
या बाजाराची खासियत म्हणजे येथे मिळणारे अत्यंत परवडणारे दर. हिवाळ्यात लागणाऱ्या अनेक वस्तूंची सुरुवात केवळ 50 रुपयांपासून होते. विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाइन्समुळे ग्राहकांना विशेष पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
कानटोपी 50 ते 200 रुपयांपर्यंत, तर लहान-मोठ्यांसाठी स्वेटर्स 450 रुपयांपासून अगदी 1000 रुपयांपर्यंत विविध दरांत मिळतात. पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र आणि आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. जॅकेट्सची किंमत 500 ते 1200 रुपयांपर्यंत असून थंडीपासून बचाव करणारे हातमोजे 100 ते 250 रुपयांच्या दरम्यान मिळतात. पायमोजे 50 ते 200 रुपयांत तर मफलर 150 ते 250 रुपयांत उपलब्ध आहेत.
advertisement
थंडीची चाहूल लागताच स्वस्त आणि दर्जेदार कपड्यांच्या शोधात असलेले अनेक मुंबईकर या मार्केटकडे धाव घेत आहेत. विविध पर्याय व खिशाला परवडणारे दर यामुळे परेलचे हे स्वेटर मार्केट दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 4:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Clothes : मुंबईकरांनो, स्वेटर, जाॅकेट घेऊन टाका, थंडी वाढणार, किंमत फक्त 50 रुपयांपासून!

