IPL 2026 : मुंबईला ऑक्शनला जायचीही गरज नाही... पठाणने आधीच सांगितली MI ची घाम फोडणारी Playing XI
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठीचा लिलाव 16 डिसेंबरला अबु धाबीमध्ये होणार आहे. आयपीएल लिलावाआधी सर्व 10 टीमनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव 16 डिसेंबरला अबु धाबीमध्ये होणार आहे. आयपीएल लिलावाआधी सर्व 10 टीमनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रिटेनशन लिस्ट जाहीर केल्यानंतर लिलावामध्ये सर्वाधिक पैसे केकेआरकडे तर सगळ्यात कमी पैसे मुंबई इंडियन्सकडे असणार आहेत. केकेआर लिलावामध्ये 64.3 कोटी रुपये घेऊन उतरेल, तर सीएसकेकडे खेळाडू विकत घेण्यासाठी 43.4 कोटी रुपये असतील. दुसरीकडे मुंबई इंडियन्सकडे मात्र फक्त 2.75 कोटी रुपये शिल्लक आहेत, ज्यात त्यांना जास्तीत जास्त 5 खेळाडू विकत घेता येतील, यात एक परदेशी खेळाडू विकत घेता येऊ शकतो.
आयपीएल रिटेनशनआधी मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जाएंट्सकडून शार्दुल ठाकूर, गुजरात टायटन्सकडून शरफेन रदरफोर्ड आणि केकेआरकडून मयंक मार्कंडे यांना ट्रेड केलं, तर अर्जुन तेंडुलकरला त्यांनी लखनऊ सुपर जाएंट्सना दिलं. आयपीएल ट्रेडमध्ये मुंबईने एक फिनिशर, एक फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आणि एक स्पिनर विकत घेतला आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सने लिलावाआधीच त्यांची प्लेइंग इलेव्हन बनवून टाकली आहे.
advertisement
भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने मुंबई लिलावामध्ये गेली नाही, तरी विरोधी टीमना घाम फोडणारी प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवू शकते, असं वक्तव्य केलं आहे. इरफान पठाणने एका व्हिडिओमध्ये मुंबईची प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट सब कसा असेल, हे आधीच जाहीर करून टाकलं आहे. जिकडे दोन स्पिनरची गरज नसेल तेव्हा मुंबई मयंक मार्कंडेऐवजी दीपक चहरलाही संधी देऊ शकते.
advertisement
पठाणने सांगितली मुंबईची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, रेयान रिकलटन (विकेट कीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), शरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मिचेल सॅन्टनर, मयंक मार्कंडे, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह (इम्पॅक्ट सब)
मुंबईने रिटेन केलेले खेळाडू
अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे (ट्रेड), मिचेल सॅन्टनर, नमन धीर, रघू शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा, रियान रिकलटन, शार्दुल ठाकूर (ट्रेड), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विल जॅक्स
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुंबईला ऑक्शनला जायचीही गरज नाही... पठाणने आधीच सांगितली MI ची घाम फोडणारी Playing XI


