पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकुने भोसकून तरुणाची निर्घृण हत्या, मित्रावरही केले वार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे शहराच्या चंदननगर परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: गुन्हेगारीच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. पुणे शहराच्या चंदननगर परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहे. यावेळी संबंधित तरुणाच्या मित्रावर देखील वार करण्यात आले. या प्राणघातक हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी काही तरुण जमले होते. याच दरम्यान, अज्ञात आरोपींनी १८ वर्षीय सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही क्षणातच मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य एक तरुणही जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्वाच्या लढाईतून घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री आठ वाजता झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना रवाना केले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2025 8:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकुने भोसकून तरुणाची निर्घृण हत्या, मित्रावरही केले वार


