पोलिसांच्या तडीपारीच्या नोटिसीला आव्हान, आरोपीने एक गोष्ट लपवली, न्यायालयाचा जबर दणका
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची झाडाझडती सुरू आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरात तडीपारीच्या नोटिसीला आव्हान देणाऱ्या गुन्हेगाराला न्यायालयात धाव घेणं पडलं महागात पडले आहे. एका सराईत गुन्हेगाराने तडीपारीच्या नोटिसीला न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले. मात्र न्यायालयाने जोरदार दणका देत गुन्हेगाराला तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
इब्राहिम खाजासाब कुरेशी असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून सोलापूर शहरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. इब्राहिम कुरेशी याने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारीच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अमूल्य वेळ वाया घालवण्याचा निष्कर्ष काढून तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला.
सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची झाडाझडती सुरू आहे. इब्राहिम कुरेशी याच्यावर 2009, 2015, 2016, 2018, 2021, आणि 2025 या कालावधीत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
advertisement
रिट पिटीशन दाखल करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे समोर आल्यानंतर सदरच्या आरोपीकडून एक लाख दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक आहे अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने रक्कम वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आरोपीने एक गोष्ट लपवली, न्यायालयाकडून जबर दणका
सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने इब्राहिम कुरेशी या व्यक्तीवर तडीपारीचा प्रस्ताव होता. त्याची चौकशी सोलापूर शहर आयुक्तांकजे करण्यात आली. त्यादरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना विनंती केली होती की आम्हाला या प्रस्तावाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागायची असल्याने प्रस्तावाला तीन महिन्यांची स्थगिती द्यावी. त्यांनी न्यायालयात जाऊन आपल्यावरील कारवाईचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. सुनावनीदरम्यान, न्यायालयाने आमचे मत मांडण्यास सांगितले. आमच्याकडून एसीपींनी बाजू मांडली. त्यांनी कारवाई अहवाल कोर्टासमोर सादर करून त्यात स्पष्ट केले होती की आम्ही तीन महिन्यांची स्थगिती दिलेली नाही. परंतु त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यास आम्ही वेळ दिलेला आहे. हीच गोष्ट आमच्यापासून का लपवली? असा सवाल करून न्यायालयाने आरोपीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला, असे सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 20, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांच्या तडीपारीच्या नोटिसीला आव्हान, आरोपीने एक गोष्ट लपवली, न्यायालयाचा जबर दणका