Eknath Shinde : ठाकरेंनंतर आता नंबर भाईंचा? महापालिका निवडणुकीआधी भाजपच्या गोटात हालचाली

Last Updated:

Eknath Shinde : शिंदे यांचे लक्ष ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेची सत्ता काढण्याकडे असले तरी ठाण्यातही शिंदे यांची कोंडी होणार असल्याचे संकेत आहेत.

News18
News18
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळ्यांच राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीची होण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून भाजपसोबत जाणारे एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिंदे यांचे लक्ष ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेची सत्ता काढण्याकडे असले तरी ठाण्यातच शिंदे यांची कोंडी होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा पॉलिटिकल गेम होणार का, याची चर्चा रंगली आहे.

शिंदे-शाहांमध्ये चर्चा...

राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी मुंबईतही वास्तव्य केले. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांची मंगळवारी सकाळच्या सुमारास भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मुंबई महापालिकेतील 227 पैकी 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्याकडे 107 उमेदवार असल्याची माहिती शिंदे यांनी शाह यांना दिली. शाह यांनी शिंदे यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपकडून मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यावर चाचपणी सुरू आहे. भाजपने स्वबळासाठी आधीच तयारी केली आहे.
advertisement

ठाण्यातही कोंडी, ठाकरेंनंतर शिंदेंचा नंबर?

भाजपने मुंबईसह ठाण्याचा गड सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्ष फुटीनंतर मुंबईत शिवसेना ठाकरे गट दुबळा झाल्याचे चित्र आहे. तर, भाजपची राजकीय ताकद चांगलीच वाढली आहे. तर, दुसऱ्या बाजूला ठाण्यातही भाजपने गेम प्लान करून एकनाथ शिंदेंच्या कोंडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात बळ देत शिंदे गटावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील नगरसेवक आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. यातून भाजप आपली ठाण्यात ताकद वाढवत आहे. मुंबईसह ठाण्यातही आपलाच महापौर बसावा यासाठीचे प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात मोठं वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी भाजपने आखणी केली आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिकेतील सत्ता गेल्यास त्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईपेक्षा होमग्राउंड राखणं अधिक आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंंदेंचा नंबर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
advertisement

अमित शाह यांच्या सूचना काय?

अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला. शाह यांनी मुंबई, ठाणे, पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतची चाचपणी करण्याचे निर्देश भाजप नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितले. या महत्त्वाच्या तीन शहरांसोबत आणखी काही महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याची परिस्थिती आणि त्यातून यश मिळण्याची शक्यता किती, याचा आढावा घेण्याची सूचना शाह यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : ठाकरेंनंतर आता नंबर भाईंचा? महापालिका निवडणुकीआधी भाजपच्या गोटात हालचाली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement