Nilesh Ghaywal: १७ गुन्हे दाखल असूनही निलेश घायवळच्या 'स्वच्छ चारित्र्यावर' शिक्का, नाकाने कांदे सोलणारे अहिल्यानगर पोलीस तोंडावर पडले

Last Updated:

Ahilyanagar Police: अहिल्यानगर पोलिसांनी एकप्रकारे निलेश घायवळ याचे स्वच्छ चारित्र्य आहे, असेच अहवालाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला.

नाकाने कांदे सोलणारे अहिल्यानगर पोलीस तोंडावर पडले
नाकाने कांदे सोलणारे अहिल्यानगर पोलीस तोंडावर पडले
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला पळून गेल्यानंतर त्याच्या पलायनामागे कोण आहे, याचा तपास सुरू आहे. तसेच मकोका सारखे गंभीर गुन्हे असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला? पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त का केला नाही? असे सवालही विचारले जात आहेत. दुसरीकडे निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून त्यांनीच घायवळ याला क्लिनचिट दिल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र अहिल्यानगर पोलिसांनी बचावात्मक स्पष्टीकरण दिले होते. मात्र समोर आलेल्या अहवालानुसार निलेश घायवळ याच्यावर एकही गुन्हा दाखल नसून कोणत्याही प्रकरणात त्याची न्यायालयीन चौकशी सुरू नाही, असा शेरा अहिल्यानगर पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आमची काहीच चूक नाही असे सांगून नाकाने कांदे सोलणारे अहिल्यानगर पोलीस तोंडावर पडले आहेत.
पासपोर्ट मिळविण्यासाठी पोलिसांचा चारित्र्य पडताळणी अहवाल अत्यावश्यक असतो. निलेश घायवळ याने मूळ पत्ता अहिल्यानगर जिल्ह्याचा दिलेला होता. त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांची भूमिका या प्रकरणात निर्णायक मानली जात होती. नामचिन गुंड असूनही अहिल्यानगर पोलिसांनी पडताळणी अहवाल सकारात्मक कसा दिला असे विचारून त्यांचा अहवाल संशयाच्या घेऱ्यात होता. मात्र घावळ पासपोर्ट प्रकरणात आम्ही कोणताही अहवाल दिला नाही, असे अहिल्यानगर पोलिसांनी स्पष्ट करीत पोलीस पडताळणी होण्याअगोदर निलेश घायवळला पुण्यातून पासपोर्ट अदा झाला, असा सनसनादी दावा केला. मात्र आता समोर आलेल्या अहवालानुसार पोलिसांनीच घायवळ याच्यावरील गुन्हे लपवून केवळ अर्जदार मूळ पत्त्यावर हजर नाही, असा शेरा देऊन पळवाट काढल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अहिल्यानगर पोलिसांनी एकप्रकारे निलेश घायवळ याचे स्वच्छ चारित्र्य आहे, असेच अहवालाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला.
advertisement

तत्काळ पासपोर्टसाठी घायवळला शिफासपत्र कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याचे?

तत्काळ पासपोर्ट काढायचा असेल तर पोलीस अधिकाऱ्याचे शिफारसपत्र अत्यावश्यक असते. घायवळच्या तत्काळ पासपोर्ट प्रकरणात कोणत्या आयपीएस अधिकाऱ्याने शिफासपत्र दिले? त्याचे नाव का समोर येत नाही? हा कळीचा प्रश्न आहे.
अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना न्यूज १८ लोकमतने या सगळ्यावर विचारले असता, घायवळ याच्या मूळ पत्यावर तो आम्हाला आढळून न आल्याने आम्ही 'नॉट अॅव्हायलेबल' असा शेरा मारल्याचे ते म्हणाले. मात्र त्याच्या नावावरील गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी का लपवली, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. प्रश्न ऐकून त्यांनी फोन कट केला.
advertisement
ज्यावेळी निलेश घायवळला तत्काळ पासपोर्ट दिला गेला, त्यावेळी सोमनाथ घारगे हे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक नव्हते, हे देखील तितकेच खरे आहे. परंतु तत्कालिन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निलेश घायवळ याच्या नावावरील गुन्हे लपवले, याच्याकडेही डोळेझाक करून चालणार नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nilesh Ghaywal: १७ गुन्हे दाखल असूनही निलेश घायवळच्या 'स्वच्छ चारित्र्यावर' शिक्का, नाकाने कांदे सोलणारे अहिल्यानगर पोलीस तोंडावर पडले
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement