Ahilyanagar leopard attack : आई घरात बाप शेतात, दबक्या पावलानं आला कविताला पळवून घेऊन गेला अन्...

Last Updated:

अहिल्यानगर देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात कविता लहानु गांगड या तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, नागरिकांत संताप, वनविभागाने दोन बिबटे जेरबंद केले.

News18
News18
हरिष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: तीन वर्षांच्या चिमुकल्याला नाशिकमधून बिबट्याने फरफटत नेल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक असाच प्रकार समोर आला आहे. शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने संध्याकाळी आसपास कुणी नाही ते पाहून संधी साधली आणि 3 वर्षांच्या चिमुकलीला दबक्या पावलांनी येऊन पळवून नेलं. आई घरात होती, तर बाप शेतात काम करत होता. चिमुकली अंगणात खेळत होती.
3 वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने अक्षरश: अंगणातून दबक्या पावलांनी पळवून शेतात नेलं. चिमुकलीसोबत काहीतरी भयंकर घडल्याचं आईला जाणवलं, ती बाहेर येईपर्यंत बिबट्या तिच्या डोळ्यादेखत पसार झाला. तोपर्यंत बराच उशीर झाला. आरडाओरडा करुन आईनं मुलीला वाचवण्यासाठी मदत मागितली. रात्री उशिरा शेजारच्या ऊसाच्या शेतात अर्धवट खालेल्या अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह सापडला.
वन विभागाविरोधात आक्रमक पवित्रा
या सगळ्या प्रकरणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. ही धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील देवठाण इथे शेळके वस्तीत घडली. तीन वर्षीय कविता लहानु गांगड या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दुदैवी घटनेनंतर वनविभागाने तातडीने पिंजरा लावत दोन बिबट्यांना केलं जेरबंद. त्यामध्ये एक मादी आणि एक दुसरा बिबट्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
57 वर्षीय महिलेचा मृत्यू
यापूर्वीही मे महिन्यात देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात विठावाई काळे या 57 वर्षीय महिलेचा झाला होता मृत्यू झाला होता. वारंवार बिबटयाच्या हल्ल्यांमुळे अकोले तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे. अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील बिबटे जेरबंद करा या मागणीसाठी उद्या देवठाण गावात रास्ता रोकोही केला होता. लहान मुलं सुरक्षित नाहीत, वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
शेतशिवारात कुंपण घालण्याची वेळ
ऊस, मका, गवत, इतर पिकांसाठी बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी कुंपण घालण्याची वेळ आली आहे. या भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. घर, शेत, अंगणात बिबट्यात अगदी मोकाट फिरत असतो. त्यामुळे वारंवार हल्ल्याच्या घटना होत आहेत. वनविभागाने तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या ठशांचा पाठलाग करून पिंजरा लावून दोघांना जेरबंद केलं आहे. आणखी शोधमोहीम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilyanagar leopard attack : आई घरात बाप शेतात, दबक्या पावलानं आला कविताला पळवून घेऊन गेला अन्...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement