आता त्या पोटासाठी टाळी वाजवणार नाहीत! 80 तृतीयपंथींचा मोठा निर्णय, करणार हे काम!

Last Updated:

Inspiring Story: राज्यात पहिल्यांदाच 80 तृतीयपंथी भगिनींनी एकत्र येत स्वत:चा शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी माहिती दिलीये.

+
राज्यात

राज्यात हे पहिल्यांदाच घडतंय! 80 तृतीयपंथी भगिनींनी ठरवलं अन् निवडला स्वावलंबनाचा मार्ग, काय केलं?

अहिल्यानगर: तृतीयपंथीयांना समाजातील वंचित घटक म्हणूनच पाहिलं जातं. मिळकतीचे कायमचे साधन नसल्याने बऱ्याचदा पैसे मागूनच त्यांची रोजी-रोटी सुरू असते. परंतु, अहिल्यानगरमधील तृतीयपंथी भगिनींनी स्वावलंबनाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंय. 80 जणींनी एकत्र येत स्वावलंबी जगण्यासाठी शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केलीये. विशेष म्हणजे राज्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या शेळीपालन केंद्रांचे उद्घाटन नुकतेच झाले. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील चितळी या गावात तृतीयपंथियांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसायाची सुरुवात केली. तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे.
advertisement
चितळी येथे 80 तृतीयपंथी भगिनींनी मिळून 5 वर्षांपूर्वी संस्थेच्या नावावर तीन एकर जागा घेतली होती. आज समाज कल्याण विभागाच्या पाच लाख रुपयांच्या शासकीय मदतीतून साधारण 2 हजार चौरस फूट क्षेत्रात पशुपालन शेड उभारण्यात आलं आहे. सध्या या केंद्रात 16 बकऱ्यांचे पालन केले जात आहे. तसेच शेजारीच एक हजार चौरस फूट क्षेत्रात निवासस्थानांचे बांधकाम देखील सुरू आहे. या जागेत निवासस्थान, कुपनलिका व तारेच्या कुंपणासाठी सामाजिक संस्थेने मदत केली आहे, असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले.
advertisement
शेळीपालन व्यवसायामुळे तृतीयपंथी भगिनींना आर्थिक मदती बरोबर आत्मसन्मानही मिळणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या व देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरावा व तृतीयपंथीयांना या प्रकल्पाला बघून ऊर्जा मिळावी हा एकमेव उद्देश आहे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असल्याचंही शेख म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
आता त्या पोटासाठी टाळी वाजवणार नाहीत! 80 तृतीयपंथींचा मोठा निर्णय, करणार हे काम!
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement