Dancer Dipali Patil Death : बाजारात जाते म्हणून निघाली, रिक्षा पकडली अन् थेट लॉजवर; हॉटेल साईमध्ये 5 तासात काय घडलं?

Last Updated:

Ahilyanagar Dancer Dipali Patil ends life : दिपालीचा काही पत्ता लागेना म्हणून तिच्या मैत्रिणींना तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी काहीही संपर्क होऊ शकला नाही.

Ahilyanagar Dancer Dipali Patil ends life
Ahilyanagar Dancer Dipali Patil ends life
Jamkhed Dancer Death At Lodge : अहिल्यानगरच्या जामखेड येथे आपल्या मैत्रिणीसोबत राहणाऱ्या दीपाली गोकुळ पाटील नृत्यांगणेने शहरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने गुरूवारी खर्डा रोडवरील हॉटेल साई लॉज येथील एका रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. दिपालीने टोकाचं पाऊल का उचललं? असा सवाल विचारला जात आहे. अशातच या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाचं नाव समोर आलं आहे.

रिक्षा पकडली अन् खर्डा रोडवर गेली

दीपाली गुरूवारी सकाळी आपल्या मैत्रिणींना मी बाजारात जाऊन येते असं सांगून बाहेर पडली. 33 वर्षीय नृत्यांगणा दीपाली गोकुळ पाटील जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करत होती. सर्वांना वाटलं की, ती कलाकेंद्रात गेली. पण तिने घराबाहेर गेल्यावर ऑटो पकडली अन् खर्डा रोडवर गेली. तिथं ती हॉटेल साई लॉज गेली. 5 तासांपासून दिपालीचा काही पत्ता लागेना म्हणून तिच्या मैत्रिणींना तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी काहीही संपर्क होऊ शकला नाही.
advertisement

मैत्रिणींना हाका मारल्या पण...

मैत्रिणींना जेव्हा रिक्षावाल्याशी विचारपूस केली तेव्हा एका रिक्षाचालकाने तिला हॉटेल साई लॉजला सोडल्याचं सांगितलं. लगबघीने तिच्या मैत्रिणी 5.30 च्या सुमारास त्या लॉजवर गेल्या. त्या तिच्या रूमच्या दिशेने गेल्या असता त्यांना रूम आतून लॉक असल्याचं आढळलं. मैत्रिणींना हाका मारल्या पण काहीच प्रतिसाद आतून आला नाही. त्यानंतर लॉज चालकाला विनंती केल्यानंतर डुप्लिकेट चावीने रुम उघडली. आत पाहतो तर काय, दिपाली पंख्याला लटकली होती. तिच्या मैत्रिणींच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement

जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी तिची मैत्रिण हर्षदा रवींद्र कामठे हिच्या तक्रारीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ती मूळची ठाणे जिल्ह्यातील कल्याणची होती. पण सध्या ती आपल्या एका मैत्रिणीसोबत जामखेडच्या तपनेश्वर भागात भाड्याने राहत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता.
advertisement
दरम्यान, कर्जत जामखेड चे आमदार आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Dancer Dipali Patil Death : बाजारात जाते म्हणून निघाली, रिक्षा पकडली अन् थेट लॉजवर; हॉटेल साईमध्ये 5 तासात काय घडलं?
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement