Ahmednagar News : मोठी बातमी, पालिका आयुक्तांनीच मागितली तब्बल 9 लाखांची लाच, ACB येण्याआधीच पळाले

Last Updated:

Ahmednagar News : अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे फरार झाले आहेत. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे लाच मागितल्याची तक्रार करण्यात आलीय.

अहमदनगर महानगरपालिका
अहमदनगर महानगरपालिका
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : देशात भ्रष्टाचार हा गंभीर प्रश्न होत चालला आहे. शिपयापासून सचिवापर्यंत प्रत्येकाला सरकवल्याशिवाय काम होत नाही, अशी धारणा आता सर्वसामान्यांची झाली आहे. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणत सत्तेत आलेल्या भाजपलाही ही भ्रष्टाचारी कीड रोखता आली नाही. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीय. महापालिका आयुक्तांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल 9 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, एसीबीची रेड पडणार याची कुणकुण लागल्याने सध्या आयुक्त फरार झाले आहेत.
महापालिका आयुक्त फरार
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी आणि त्यांचे स्वयंसहाय्य देशपांडे यांनी एका बांधकाम व्यवसायाकडे 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने औरंगाबाद येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रुचला होता. मात्र, याची कुणकुण लागल्यानंतर आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्यासह स्वयंसहाय्यक दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी एसीबीने अहमदनगर महानगरपालिकेतील आयुक्तांचे दालन सील केले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
advertisement
नगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे कार्यालय पोलिसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर पालिका लिपिक शेखर देशपांडे याच्याकडून ही 8 लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांचे दालन पोलिसांनी अचानकपणे ताब्यात घेतले आहे. एसीबीने कारवाई केल्याची चर्चा नगर शहरांत सुरू आहे. आता फरार झालेल्या डॉ पंकज जावळे यांच्यावर काय कारवाई होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/अहमदनगर/
Ahmednagar News : मोठी बातमी, पालिका आयुक्तांनीच मागितली तब्बल 9 लाखांची लाच, ACB येण्याआधीच पळाले
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement