Lok Sabha Election : नगरमध्ये नव्या राजकारणाची नांदी, भाजपमधीलच दोन नेत्यांमध्ये दिलजमाई!
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Lok Sabha Election : जामखेड तालुका भाजप पदाधिकऱ्यांची प्रचार नियोजन बैठक खासदर सुजय विखे आणि आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : जामखेड तालुका भाजप पदाधिकऱ्याची प्रचार नियोजन बैठक खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी पार पडली. लोकसभा निवडणुकीला राम शिंदे हे इच्छुक होते. त्यानंतर त्यांचा वाद हा देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता. त्यानंतर आज जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पारचा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे. नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आता मतभेद नाहीत : राम शिंदे
आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता, याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असे उत्तर खा. सुजय विखे यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर दिली. मधल्या काळात कार्यकर्त्यांत जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली. त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे. आता एकजुटीने ज्येष्ठ नेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली.
advertisement
नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पारचा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे. नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
advertisement
पवार गटाकडून आमदार निलेश लंके
view commentsभाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निलेश लंके यांना मैदानात उतरवले आहे. मागच्याच आठवड्यात निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्याच निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत निश्चित झाली आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
April 02, 2024 6:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Lok Sabha Election : नगरमध्ये नव्या राजकारणाची नांदी, भाजपमधीलच दोन नेत्यांमध्ये दिलजमाई!


