Maharashtra politics : लोकसभेसाठी इच्छुक राम शिंदेंचा नवा डाव; सुजय विखेंची डोकेदुखी वाढणार?

Last Updated:

भाजपाची महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र दुसरीकडे यावेळी राम शिंदे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

News18
News18
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्व प्रमुख पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून शनिवारी लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील उमेदवार अद्याप भाजपकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत, मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार तयारीला लागल्याचं चित्र आहे. भाजप नेते राम शिंदे देखील यावेळी अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता पक्षाचं तिकीट कोणाला मिळणार? सुजय विखे की राम शिंदे? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र दुसरीकडे राम शिंदे यांनी लोकसभेचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके पुन्हा एकदा एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. निलेश लंके यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे नाटक आयोजित केले होते.  या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार आणि खासदारकीला इच्छुक असलेले राम शिंदे यांनी हजेरी लावली
advertisement
आमदार निलेश लंके यांनी शिंदे यांना आवर्जून निमंत्रण दिले, यावेळी राम शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला राम शिंदे आणि निलेश लंके हे दोघेही इच्छुक उमेदवार आहेत. मात्र भाजपकडून सुजय विखे व राम शिंदे हे दोघेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यातच आता राम शिंदे यांची निलेश लंके यांच्याशी जवळीक वाढत आहे. ही जवळीक सुजय विखे यांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की भाजपाची लोकसभेची इतर राज्यातील यादी जाहीर झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील यादी उशीर जाहीर होईल, कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतरच भाजपाकडून उमेदवारी जाहीर होईल. असं यावेळी राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Maharashtra politics : लोकसभेसाठी इच्छुक राम शिंदेंचा नवा डाव; सुजय विखेंची डोकेदुखी वाढणार?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement